दीपक खिलारे
Indapur | बावडा : बावडा गावचे ग्रामदैवत जोगेश्वरी भैरवनाथ यात्रा गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवसांमध्ये भाविकांच्या गर्दीत व उत्साही वातावरणात पार पडली. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
बावडा गावचे भैरवनाथाचे मंदिर प्राचीनकालीन आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.27) रात्री मंदिरामध्ये गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. तर शुक्रवार (दि.28) या मुख्य दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
गावचे नागरिक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, निहार ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे आदी मान्यवरांनी भैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर रात्री श्रींची छबीना मिरवणूक गावातून फटाक्यांच्या आतिषबाजीत व अलोट गर्दीत गर्दीत पार पडली. छबिना मिरवणुकीत घोड्यावरील भैरवनाथाच्या मूर्तीस नारळाचे तोरण बांधण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
यावेळी भैरवनाथाच्या घोड्याचं चांगभलं च्या घोषणांनी वातावरण अधिकच उत्साही बनले होते. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.29) रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व काळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने यात्रा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले, असे सरपंच किरण पाटील यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur | बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रास उत्कृष्ट आरोग्य केंद्राचा पुरस्कार प्रदान
Loni Kalbhor Crime : कदमवाकवस्ती येथील महिलेचा खून करून मृतदेह फेकला मांजरीतील विहरीत..