दीपक खिलारे
Indapur | इंदापूर : इंदापूर तालुक्यात दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात असताना जनावरांचा बाजार चालू न करता फक्त काही लोकांच्या हौसेसाठी घोडेबाजार व कुत्र्यांचा खेळ चालू आहे, त्यापासून बाजार समितीला उत्पन्न कमी व खर्च ज्यादा होत आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी साथ दिल्यास बाजार समितीच्या आवारात जनावरांचा बाजार भरवणार आहे. असे मत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अशोक घोगरे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना अशोक घोगरे म्हणाले, सत्ताधारी सत्तेमध्ये येईपर्यंत बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे वेतन आयोग चालू होता, परंतु शेजारील बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन आयोग दिले जाते, परंतु इंदापूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व वेतन वाढ झाली नाही.
इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब, पेरू, केळी,द्राक्ष, कांदा,टोमॅटो, आणि भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ लागले आहे. परंतु बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी दूरदृष्टी नसल्याने बाजार समितीत गेल्या पाच वर्षात कोणतीही सुधारणा झाली नाही.
कै. शंकरराव पाटील,कै. गणपतराव पाटील,कै. महादेवराव बोडके, दशरथ माने यांनी बाजार समिती नावारूपाला आणली. परंतु मागील तीन-चार वर्षांमध्ये बाजार समितीला उतरती कळा लागली.
स्वाभिमानी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून महारुद्र पाटील, प्रचार प्रमुख शशिकांत तरंगे, शिवाजी इजगुडे यांनी मतदारांसमोर चांगले उमेदवार देऊन पर्याय ठेवला आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दाबावाला बळी न पडता चांगल्या माणसांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. असे आवाहन अशोक घोगरे यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur | इंदापूर शहरात परशुराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न
Indapur : निमगाव केतकी येथील ईदगाह सुशोभीकरणासाठी 15 लाखाचा निधी : राजवर्धन पाटील