इंदापूर : बावडा येथील मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने बावडा – निरा-नरसिंहपूर असा प्रवास करत असताना रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसून येताच अपक्ष उमेदवार प्रविण माने तात्काळ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन माने यांनी आपल्या ताफ्यातील गाडीतून अपघातग्रस्तांना दवाखान्यात पाठवून दिले. त्याचवेळी माने यांनी संबंधित डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार म्हणून प्रविण माने हे इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. प्रविण माने हे तालुका दौऱ्यावर असून गाव भेट दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माने यांच्या या कृतीमुळे त्यांच्यातील संवेदनशील आणि तत्परतेचे दर्शन झाले.