Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूरसह नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चार मजली उड्डाणपूल बांधणार, स्वारगेट ते उरळी कांचन मेट्रो नेणार..: लोणी काळभोर येथील सभेत अजित पवार यांची ग्वाही…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 November 2024, 14:18

लोणी काळभोर : हवेलीचे वैभव असलेला यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना लवकर सुरु करणार आहे. पुणे सोलापूर महामार्गासह नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यवत गावापर्यंत उड्डाणपुल तर स्वारगेट ते उरुळी कांचन पर्यंत मेट्रो नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी गुलटेकडीला जाण्यासाठी शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहे. त्यांच्यासाठी थेऊर येथील ‘यशवंत’च्या जागेत बाजार समिती सुरु करू. तसेच हवेलीच्या पूर्व भागासाठी हडपसर महानगर पालिकेचे नियोजन आहे. परंतु, यासाठी समाविष्ठ गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायु‌तीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील खोकलाई चौकात शनिवारी (ता.9) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावेळी यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, दादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, वैशाली नागवडे, पूनम चौधरी चित्तरंजन गायकवाड, योगेश काळभोर, संतोष आबासाहेब कांचन, प्रवीण काळभोर, अमित बाबा कांचन, जितेंद्र बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन व वाघोली या गावातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता. या ग्रामपंचायती नगरपंचायतीच्याही पुढे गेलेल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत व नगर परिषद यांना ग्रामपंचायत पेक्षा जास्त निधी मिळतो. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी येथील जनतेचा होकार असल्यास, या भागासाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आहे.

यशवंत कारखान्याची ची 225 एकर जागा आहे. या जागेपैकी 100 एकर जागेमध्ये अत्याधुनिक पद्धतीची कृषी उत्पन्न बाजार समिती व राहिलेल्या जागेमध्ये यशवंत कारखाना नव्याने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ. विकासकामासाठी कोठेही कमी पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडू नका. मला जर कारखाना बंद पडायचा असता तर घोडगंगा कशाला व्येंकटेश बंद पडला असता. बंद पडलेला कारखाना मुलाच्या हाती दिला आहे. कसा तो तरी चालू करणार? मी काही जास्त बोलणार नाही. परंतु, तुम्हा सर्वांना माहिती आहे. भावकी कशी असते ते.

 

शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सोडवू : अजित पवार

शिरूर हवेली तालुक्यातील जनतेच्या खूप समस्या आहेत. खडकवासला धरणातून शेतीसाठी पाणी आवर्तन सोडण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो प्रश्न लवकरच मार्गी लावू. पण, शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना प्रचंड मतांनी विजयी करा. तुंम्ही विकासाची चिंता करून नका. शिरूर हवेलीच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ. असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले आहे.

शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा : शिवाजी आढळराव पाटील

यावेळी बोलताना शिवाजी आढळराव म्हणाले की, महाराष्ट्रात विकासाच्या शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा पवार होय. कष्टकरी, शेतकरी, मजूर, पाणी पुरवठा योजना, लाडकी बहिण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी व अशा अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना राबविल्या आहेत. सद्या राजकारणामध्ये खूप गोंधळ झाला आहे. कुणी कोणाची कामे चोरायची आणि दुसऱ्याने आणलेल्या कामावर आपली लेबल लावायची. खामगाव टेक येथील नदीवरील पूल मंजूर करून आणला. मात्र विद्यमान आमदाराने पुलाच्या कामाचे उद्घाटन करून कामाचे श्रेय घ्यायचे. पण सत्ता असो अथवा नसो आम्ही मतदार संघात विकासकामे केली आहेत. माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनीही हजारो माता भगिनींना देवदर्शन घडवून एक प्रकारे श्रावण बाळाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघातील श्रावण बाळ अर्थात महायुतीचे उमेदवार माऊली यांना एक संधी द्या. माऊली नक्की परिवर्तन घडवून दाखवेल.

जनता विद्यमान आमदारावर नाराज : ज्ञानेश्वर कटके

यावेळी बोलताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, अजित दादांनी शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात मला उभा राहण्याची संधी दिल्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो. शिरूर हवेली तालुक्यातील शेतकरी, नोकरदार व कामगार वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मतदार संघात पाहिजे तेवढा विकास झाला नाही. त्यामुळे जनता ही विद्यमान आमदारावर नाराज आहे. या सर्व समस्या सोडविण्याची ताकद फक्त आपल्यामध्ये आहे. दादांनी विविध लोककल्याणकारी योजना राबवून विकास केला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी महायुतीचे सरकार येणे महत्वाचे आहे. सर्वांगीण विकासासाठी या मतदार संघातून मला निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या. असे आवाहन ज्ञानेश्वर कटके यांनी यावेळी केले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24
Next Post
Teaser for Jio Studios and Subodh Bhave’s Sangeet Manapman to be Released With Singham Again

सुबोध भावेंच्या 'संगीत मानापमान' चित्रपटाचा टिझर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp