दीपक खिलारे
Indapur News | इंदापूर : मराठी ही अभिजात भाषा असून आपली मातृभाषा आहे तर हिंदी ही राष्ट्रभाषा तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. सर्वाधिक युवा पिढी आपल्या देशात असून त्यांनी तिन्ही भाषेत प्रभुत्व प्राप्त करून उद्योजक म्हणून पुढे येणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन इंदापूर (Indapur News) पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी केले.
२७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिवस…
२७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिवस असून या निमित्त इंदापूर आरोग्य संदेश प्रतिष्ठान च्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २८ शाळा आणि विद्यालयातील ११,८७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याचे बक्षीस वितरण इंदापूर अल्फा बाईट सभागृहात नुकतेच पार पडले. यावेळी वरील प्रतिपादन विजयकुमार परिट यांनी केले आहे.
विजयकुमार परिट पुढे म्हणाले, इंग्लिश मीडियम आणि मराठी माध्यमाच्या मुलांना मराठी भाषेचे महत्त्व समजून सांगण्याचा आरोग्य संदेश प्रतिष्ठानचा उपक्रम अनुकरणीय असून इथून पुढे अशा उपक्रमास सहकार्य केले जाईल. सुंदर अक्षर या दागिन्यांची विद्यार्थ्यांनी सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी जाणीव पूर्वक जपणूक करणे गरजेचे आहे.
दरम्यान, हस्ताक्षर स्पर्धेतील ७१ जणांना सन्मान चिन्ह तर १८० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक मुक्ताई ब्लड सेंटरचे अध्यक्ष अविनाश ननवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवून त्यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वर्षा ननवरे , स्मिता वाघमारे, रेखा सुरवसे, जमीर शेख यांनी काम पाहिले.
तर मुक्ताई ब्लड बँकेचे अध्यक्ष अविनाश ननवरे, ज्योती जगताप, फौजीया शेख, सुप्रिया आगरखेड, संजय सोरटे, प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय ठोंबरे, संचालक धरमचंद यांनी सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी आलेल्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्राचार्य तुषार रंजनकर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन नंदा बनसूडे व संतोषी बनकर यांनी तर आभार प्रदर्शन आगतराव इंगळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक जगताप,चारुशीला शिंदे, संचालक सुभाष पानसरे यांनी विशेष प्रयत्न केले.
हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे –
वर्षा भोंग, समृद्धी कोकणे, अंजली शिंदे, अंकित थंबत, अक्षरा सातपुते, हर्षदा कदम, कुसुम शिंदे, रिया चव्हाण, औरंग लोखंडे, तन्मय गलांडे,अनुश्री टोंगळे, वैष्णवी मेहेर, समृद्धी खाडे, श्रावणी तोडकर, कोमल साठे, प्रणिता डोंगरे, सुयश बनकर, आकांक्षा भोसले, वैभवी शिंदे, श्रद्धा मारकड, श्रावणी काटे, अथर्व जाधव, प्रणोती माने,गौरव तोबरे, प्रतीक्षा जाधव व श्वेता पवार.
भाषण स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे –
इयत्ता पहिली ते चौथी गट : प्रथम विराज खाडे, द्वितीय राजनंदिनी साळुंखे,तृतीय यशोधरा चंदनशिवे, उत्तेजनार्थ स्वरा पवार, रिया वाघमारे.
पाचवी ते सातवी गट : प्रथम – तनिष्का जाधव द्वितीय -अंजुम शेख, तृतीय – सोहम गायकवाड, उत्तेजनार्थ- अंजली वाघमोडे.
आठवी ते दहावी गट प्रथम : वैष्णवी पवार, द्वितीय- सिद्धी तनपुरे, तृतीय- ईश्वरी शेंडे यासोबतच प्रतिष्ठान मार्फत आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील पंधरा विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Indapur News : इंदापूर महाविद्यालयात शैक्षणिक धोरण चर्चा सत्र संपन्न
Indapur News : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आता विश्रांती घ्यावी ; ॲड. शरद जामदार
Indapur News : इंदापूर न्यायालयात जमीन मोजणीविषयी मार्गदर्शन