Indapur News : इंदापूर : तक्रारवाडी (ता. इंदापूर ) गावाच्या विकासासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. (The funds for the development of the village will not be allowed to decrease; Former Minister Harshvardhan Patil)
तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच मनिषा प्रशांत वाघ व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते इंदापूरच्या येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.
तक्रारवाडीच्या उपसरपंच आशाताई जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश
तक्रारवाडी(ता.इंदापूर) ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर होऊन भाजपच्या मनिषा प्रशांत वाघ या सरपंचपदी निवडुन आल्या. (Indapur News) निवडणुकीनंतर तक्रारवाडी ग्रामपंचातीच्या नुतन सरपंच मनिषा प्रशांत वाघ, उपसरपंच आशाताई जगताप, ग्रामपंचायत सदस्य शरद वाघ, प्राजक्ता वाघ, संगिता वाघ व गावातील पदाधिकाऱ्यांनी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे भेट घेतली.
यावेळी तक्रारवाडीच्या उपसरपंच आशाताई जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, तक्रारवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या विचारांची सत्ता प्रस्थापित झाली आहे. (Indapur News) यापूर्वीही आपण तक्रारवाडी गावाच्या विकासांमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहेच. नुतन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी जे-जे प्रस्ताव येतील त्यासाठी पाठपुरावा करु व गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
नूतन सरपंच मनिषा वाघ म्हणाल्या, माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तक्रारवाडी गावाचा विकास झालेला आहे. (Indapur News) यापुढील काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या, गटार योजना तसेच पाणी पुरवठा योजना आदी महत्वपुर्ण विकास कामांना गती देणार आहे.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वणवे, कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ, माजी उपसरपंच प्रशांत वाघ, (Indapur News) विजय जगताप, सचिन वाघ, गणेश वायदंडे, राजेंद्र वाघ, पोपट वाघ, बलभीम पिसाळ, उमेश वाघ,राजेंद्र गोडसे,बबलू वांझखडे, राजेंद्र आढाव, महेश वाघ,गणेश जराड,अभिनव वाघ, सूरज वाघ,रामभाऊ जाधव,जगन्ननाथ जगताप,मणेश खंडाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन दिपक वाघ यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूरच्या फुले माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ७६.९२ टक्के
Indapur News : ‘ती’ जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची – मेघ:शाम पाटील
Indapur News : भिमाई आश्रमशाळेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी