दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहाळ्यातील दुसरे गोल रिंगण शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रेशीतील आबालवृद्ध भाविक स्त्री-पुरूषांनी मोठी गर्दी केली होती. हा नेत्रदिपक सोहंळा लक्ष लक्ष नेत्रांनी टिपला.
पालखीचे उत्साहात स्वागत आणि; पावसाची आळवणी
पालखी आगमनानंतर रिंगण सोहळयासाठी कदम विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आली. टाळ मृदगांच्या गजरात पंढरीनाथ हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरात प्रथम झेंडेकरी, हंड्या वीणेकरी महिला, प्रशासनातील कर्मचारी, अश्वांनी रिंगण पूर्ण केले. यावेळी हरिनामाचा गजर भाविकांनी केला. या रिंगण सोहळ्याचे सुत्रसंचलन सुनिल मोरे व विश्वंभर मोरे यांनी केले.निमगांव केतकीच्या पान मळ्याच्या परिसरातुन इंदापूरच्या ऊस पट्टयात पालखीचे उत्साहात पावसाची आळवणी करुन स्वागत करण्यात आले.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील- ठाकरे, निहार ठाकरे, राजवर्धन पाटील, (Indapur News ) राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, तहसिलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, मुख्याधिकारी रामराजे कापरे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, माऊली चवरे,सी.ए. प्रशांत भिसे, शिवसेना ता.प्रमुख महारूद्र पाटील, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले.या वेळी मूकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यानी काढलेली दिंडी उपस्थित भाविकांचे लक्ष वेधुन घेत होती. शाळेचे मुख्यध्यापक डॉ. अमोल उन्हाळे व त्याच्या सहकार्यानी यासाठी परिश्रम घेतले.यंदा प्रथमच पालखी मुक्कांमासाठी औद्यगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील हॉलमध्ये असल्याने शहरात शुकशुकाट जाणवत होता.बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
नागरिकांकडून अन्नदान…
शंकरराव चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आरोग्य तपासणी व अन्नदान, संत गुलाबबाबा भक्त मंडळ, स्व. मंगेश (बाबा) पाटील प्रतिष्ठान, शिवसेना प्रमुख महारुद्र पाटील, आईसाहेब रिक्षा स्टॅण्ड, (Indapur News ) स्व. मारुती सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
सेल्फी साठी नागरिकांची झुंबड…
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने रिंगण सोहळा शेजारील अकलूज चौकामध्ये बसविण्यात आलेल्या विठ्ठलाच्या मुर्ती समोर उपस्थित वारकरी, नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून येत होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : मृत चित्रबलाक पक्षांना इंदापूरकरांनी वाहिली श्रद्धांजली