Indapur News : इंदापूर, (पुणे) : वनगळी (ता.इंदापूर) येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील कॉलेज ऑफ फार्मसीला शासनाने चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून मान्यता दिली आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिली. या फार्मसी कॉलेजमध्ये बी. फार्मसी ६० जागा व डी. फार्मसी ६० जागांसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया
वनगळी येथील एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलमध्ये हे एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुसज्ज प्रयोगशाळा, उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीची सुविधा, सर्व सुविधायुक्त होस्टेल आदी अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा या फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे फार्मसीचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी एस बी पाटील शैक्षणिक संकुलमध्ये फार्मसी कॉलेज सुरू केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी डी टी ई कोड १६११०असा आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता अधिक माहितीसाठी 7410002238 व 9404999209 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एस बी पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रदीप बोडके यांनी यावेळी केले.