दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचा जीवन प्रवास इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आदर्शवत आहे. इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
उपस्थितांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
माजी खासदार (स्व.) कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ) यांच्या १७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन, अभिवादन केले. (Indapur News ) या वेळी उपस्थितांनी कर्मयोगींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. समाधी स्थळावर नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांना काही दिवसांपूर्वी हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान हॉलीबॉल खेळताना पायाला दुखापत झाली होती. (Indapur News ) मात्र, आज ते व्हीलचेअरच्या साह्याने समाधी स्थळापर्यंत आले व सहकाऱ्यांसमवेत कर्मयोगी भाऊंना विनम्र अभिवादन केले.
या वेळी नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी भाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्देवी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Indapur News : शेतकऱ्याला ४ कोटींचे आमिष दाखवून, सव्वा कोटींना लुबाडले