दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर: छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीवरील शंभरी वर्ष पार केलेल्या चिंचेच्या झाडाची कत्तल करत त्या झाडावरील निवाऱ्यासाठी असलेल्या परदेशी पक्षांचा आणि घरट्यामध्ये असलेल्या अंड्यांचा इंदापूर नगरपरिषदेने घेतला बळी.
इंदापूर पोलीसठाण्यात लेखी तक्रार, मुख्याधिकारी रामराजे कापरे संपर्कक्षेत्राबाहेर
इंदापूरातील ऐतिहासिक छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीवर सुमारे शंभर वर्ष आयुर्मान असलेले चिंचेचे झाड डौलत होते. त्या झाडावर परदेशी-देशी पक्षांनी घरटेही बांधलेले होते अशी, आनंदी परिस्थिती होती.(Indapur News) हे झाड गढीच्या बुरुजावर डौलत होते. बुरुजाच्या बाहेरील बाजूकडील माती ढासळल्यामुळे झाडाची मुळे बाहेर दिसत होती, साठ ते सत्तर फूट उंच झाड तग धरुन होते.
एका वृत्तपत्रामध्ये हे चिंचेचे झाड धोकादायक अवस्थेत असल्याचे नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन इंदापूर नगरपालिका प्रशासनाने काल दि.16 रोजी दुपारी दोन वाजता जेसीबी मशीन पाठवले. झाडावर असलेल्या परदेशी चित्रबलाक व घरट्यामध्ये प्रजननासाठी घातलेली अंडी ही बाजूला करण्याचे सौदार्य न दाखवता जेसीबी मशीनद्वारे सहा तासाहून अधिक काळ चिंचेच्या झाडाला धक्के दिले. (Indapur News) अनेक प्रहार सहन केल्यानंतर ते चिंचेचे झाड जमिनीवर कोसळले. त्याचबरोबर काही चित्रबलाक पक्षी, वटवाघूळ मृत्यूमुखी पडले. घरट्यातील अंडी फुटली, प्रजनन होणारे बलक हत्तेचे पाप नगरपरिषदेने आपल्या माथ्यावर घेतले.
या घटनेचे सोशल मिडीयावर निसर्गप्रेमी प्रशांत सिताप यांनी थेट प्रक्षेपण फेसबुकवरुन केले होते. परिणामी अनेक सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळाकडे धावले. ते जीवंत चिंचेचे झाड कोसळलेले पाहून, घरट्यातील प्रजननक्षमतेमधील फुटलेली अंडी, मृत्यूमुखी पडलेले चित्रबलाक पाहून हळहळले. सर्वांनी इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामध्ये प्रा. कृष्णा ताटे, नितीन मखरे, हमीद आत्तार, महादेव चव्हाण,अशोक पोळ, सागर गानबोटे, महादेव सोमवंशी यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार इंदापूर पोलीस निरीक्षकाकडे केली.
या घटनेसंदर्भात मुख्याधिकारी रामराजे कापरे यांचेशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.
निसर्ग प्रेमी प्रशांत सिताप म्हणाले, कचरा डेपोच्या नजीक एक चित्रबलाक चा पाय मोडल्याच्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याच्यावर औषधोपचार केला.(Indapur News) त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली, चित्रबलाक नवजात पिल्ले दिसली. पन्नास पिल्लांना वाचविले, जखमी अवस्थेतील चित्रबलाक व पिल्ले यांना वनविभागाच्या ताब्यात दिले. संवर्धनासाठी जखमी पक्षांना दौंडला पाठविण्यात आले.
वर्षानुवर्षे परदेशी पक्षी विण घालण्यासाठी इंदापूर शहरातील वेगवेगळ्या झाडांवर वास्तव्य करीत आहेत. बिनधोकपणे विण तयार करुन मायदेशी परततात आज सकाळी त्या चिंचेच्या झाडाच्या आसपास घिरट्या मारताना पक्षी दिसत होते. त्यांच्या हक्काचे घर उद्धवस्त झाल्याची भावना त्यांच्या मनी होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूरच्या आमदारांनी विकासकामांचे श्रेय घेण्याची सवय बंद करावी; अँड. शरद जामदार