दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याकडून २०२३-२४ च्या गळीत हंगामामध्ये गळीत होणाऱ्या ऊसापोटी बिलाचा पहिला हप्ता २५०० रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहे. त्यानंतर ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सोमवारी (ता. ३०) दिली.
सर्व बिले, वाहतूक कंत्राटदारांची बिले नियमितपणे देणार
निरा भिमा कारखाना चालू होणाऱ्या गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देणार आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामामध्ये ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल, (Indapur News) त्यादृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले आहे. कारखान्याची सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहे. चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाची सर्व बिले, वाहतूक कंत्राटदारांची बिले ही नियमितपणे देण्याचे सर्व नियोजन कारखान्याने केलेले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार हे प्रत्येक महिन्याला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक महिन्याचा बोनस जाहीर करण्यात आला आहे, असे लालासाहेब पवार यांनी सांगितले.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, (Indapur News) हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबन देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना २५०० रुपये पहिला हप्ता देणार : हर्षवर्धन पाटील
Indapur News : गलांडवाडी अपघातानंतर ट्रक पेटवल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल
Indapur News : दसऱ्याची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकची धडक; जागीच ठार