दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांची पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अंकिता पाटील ठाकरे यांनी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून राज्यात विक्रमी मताधिक्य मिळवून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने काम केले. सध्या त्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (Indapur News) तसेच राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये अंकिता पाटील-ठाकरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा चढता आलेख पहावयास मिळत आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अग्रभागी आहेत.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्याची दिली ग्वाही
पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. (Indapur News) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आदी भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही निवडीनंतर अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : जनशक्ती शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
Indapur News : निरा भिमा कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ संपला, कारखाना सुस्थितीत : हर्षवर्धन पाटील