दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंगचा भाग मुरूम व मातीसह विहिरीत कोसळून त्यामध्ये दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील यांची माहिती
हर्षवर्धन पाटील हे मुंबईत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन म्हसोबाचीवाडी दुर्घटनेची माहिती दिली व मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्याच्या मागणीचे पत्र देऊन चर्चा केली. (Indapur News) याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, माझ्या इंदापूर मतदारसंघातील मौजे म्हसोबाचीवाडी येथे मंगळवार (दि.1) विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरू असताना कामाच्या ठिकाणी असणारा मातीचा व मुरूमाचा ढिगारा खचून विहिरीत कोसळला.
त्यामध्ये मौजे बेलवाडी (ता. इंदापूर) सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी (वय ३०), परशुराम बन्सिलाल चव्हाण (वय ३०), मनोज मारूती चव्हाण (वय ४०) या चार मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगारांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने सर्व कुटुंबियांना शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्याची गरज आहे. (Indapur News) त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार मृत्यू कामगाराच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांचे अर्थसहाय्य राज्य शासनाकडून देण्याचे जाहीर केले, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : १२० फूट खोल विहिरीत पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह चौथ्या दिवशी सापडले
Indapur News : म्हसोबावाडीची विहीर दुर्घटना दुर्दैवी – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील;