राजेंद्रकुमार शेळके
पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महविद्यालयात केसर प्रकल्प उत्पादन केंद्राचे उद्घाटन संस्थेचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्या हस्ते झाले.
सूत्रधार प्रोजेक्ट कन्सल्टन्सी व अनंतराव पवार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच ग्रामीण भागात शेतीशी निगडीत प्रकल्पाचे अनावरण पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात होत आहे. मुळशी तालुक्यात व पुणे जिल्हा शिक्षण मंडळात विद्यार्थ्यांच्या हिताचे अभिनव प्रयोग घेणारे अनंतराव पवार हे पहिलेच महविद्यालय आहे. त्याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे, असे मनोगत संस्थेचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे लागू नये. स्वतःच्या पायावर उभे राहणारे प्रकल्प त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवतील, असे प्रशासन सह सचिव ए. एम. जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगितले. या वेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उप प्राचार्य डॉ. प्रवीण चोळके, प्रोजेक्ट कन्सल्टन्सीचे सूत्रधार अजय आचार्य, मामासाहेब मोहोळ कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वृंद व विद्यार्थी समूह या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण चोळके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले, तर आभार डॉ. गणेश चौधरी यांनी मानले.