बापू मुळीक

सासवड: पाण्याचा जास्तीत जास्त साठा कसा करता येईल, याचा विचार करून, त्यावर काम करणे आणि पाण्याची बचत तसेच साठवणूक करणे, म्हणजेच भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही. याची काळजी घेणे. व्यापक संवाद आणि समूहाच्या सहभागाच्या माध्यमातून जल संवर्धनाची लोक चळवळ उभारणे. हे जलशक्ती अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानांतर्गत सासवड नगरपरिषद येथे सदर अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती माहिती, शिक्षण ,संवाद व मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जलशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली.
आयुक्त वेंकटेश दुर्वास व जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हंडे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या उपस्थितीत जलशक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय जन संघटना संस्थेचे पदाधिकारी नितीन राज वैद्य, सोनाली पवार, संजय पोलजवार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. तसेच नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती तथा निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देविदास कामठे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास सासवड नगरपरिषद कार्यालय अधीक्षक गजानन नरवाडे, नगर अभियंता जावेद मुल्ला, नगररचना सहाय्यक निखिल कांचन, आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदावंशी, आस्थापना विभाग प्रमुख पायल पोमण, विद्युत अभियंता सुलोचना हालसे, संगणक अभियंता सुवर्णा ठोके, लेखापाल स्वप्नील सूर्यवंशी, अंतर्गत लेखापरीक्षक बजरंग जगताप, सहाय्यक प्रकल्प अधिकारी जस्मिन मधाले, विशाल भोर, प्रमोद भोंडे, ज्ञानेश्वर कामठे, संजय जगताप, राम कारंडे, ओमकार भोंडे, मंदार भोंडे, मंदार जाधव, अजिंक्य चौरे, मनोज जगताप, हेमा शिंदे, अमृता रणपिसे, प्राजक्ता राजगुरू, शिल्पा रणपिसे, अमृता पोमण यांनी यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडण्यात मदत केली.

सदर जल शक्ती अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जलशक्ती केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण व शहरी भागात पावसाचे पाणी साठवणे, पारंपारिक आणि इतर जलकुंभ/ तळाशीचे नूतनीकरण, बोरवेल रिचार्ज स्ट्रक्चरर्सचा पुनर्वापर, पाणलोट विकास, सघन वनीकरण त्याचप्रमाणे नद्यांचे पुनर्जीवन करणे, जल पुनर्भणा सुधारणे असे आहे.
यावेळी जिल्ह्यासह आयुक्त वेंकटेश दुर्वास यांनी मार्गदर्शन करताना सदर अभियानाअंतर्गत नागरिकांना जल संवर्धनामध्ये सहभागी करून घेणे. शाश्वत बदलासाठी आवश्यक आहे. याची सुरुवात स्वत: पासून करायला हवी. भविष्यात हीच तुमच्या भावी पिढीसाठी खूप मोठी कमाई असेल. हे जलशक्ती अभियानाच्या उद्दिष्टांशी अगदी सुसंगत असे आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी जल सुरक्षित भारताची निर्मिती करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पाणी हे प्रत्येकाची नित्य गरज असून, पुढे पाण्याअभावी निर्माण होणारे, संभाव्य धोके लक्षात घेता केवळ स्वतःसाठी विचार न करता आपल्याच भावी पिढीसाठी पाणी जपून वापरू. सदर अभियानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन ,जलशक्ती अभियान यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सहकार्य करावे असेही त्यांनी आवाहन केले.







