पुणे : पुणेकरांची वाहतुकीतून सुटका करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिस विभागाकडून मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील आता वर्दळीच्या चौकातील सिग्नलला चालकांना आता थोडा जास्त वेळ काढावा लागणार.
शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी लवकरच ट्रॅफिक सिग्नल सुरू आणि बंद करण्याचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. पुणे शहरात सध्या २६७ ट्रॅफिक सिग्नल कार्यन्वित आहेत. शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणचे सिग्नल ९० ते १२० सेकंद आहेत. गरजेनुसार याची वेळ १५० ते १८० सेकंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी दिली.
मेट्रो प्रकल्प, पावसामुळे पडलेले खड्डे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्कींग यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे, यात वाहतूक पोलिसांनी सिग्नलला वाढविलेला वेळ हा उपयुक्त ठरणार का, हे लवकरच समजेल.