Pune News : पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शहरात १८ मे पासून आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार रोजी संपुर्ण शहराचा पाणी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. यंदा अल निनोचा प्रभाव असणार आहे. त्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा
पाणी कपातीबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली असून उपाययोजनाबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे.
पाणी पुरवठ्या बाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती दिली आहे.
शहराच्या अनेक भागाला सध्या विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास त्याचा परिणाम पुढील दोन दिवस रहातो. पाणीबंद असल्यानंतर पुढील काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होता.
दरम्यान, आठवड्यातून एकदा पाणीबंद ठेवणे उपयुक्त राहील, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला होता. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक वाचा..
Pune News | सावित्रीबाई फुले विद्यापीठात नाना पटोले यांच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली
G-20 | पुण्यात जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न