ज्ञानेश्वर काटकर (पोलिस अधिकारी-पिंपरी चिंचवड शहर)
Career News शिरूर : भारतीय संस्कृतीची निती मुल्य संभाळत प्राथमिक शिक्षण आम्ही खेडेगावात घेतले आहे. दु्ष्काळ आणि दारिद्र्याच्या वातावरणात आम्ही शिक्षण घेतले आहे. (Career News) सध्याची आधुनिक जगातही आम्ही वावरतो आहोत. मी मात्र मित्रांसमवेत शाळा शेणाने सावरून गुरूजीची मर्जी राखत शिक्षण घेतले आहे. (Career News) अशा आदर्श शिक्षका च्या हाता खाली आम्ही शिक्षण घेतले. त्या काळात चादर आणि कपबशी घरात असणे संस्कृतीचे श्रीमंतीचे लक्षण होते. (Career News)
आमच्या सारख्या अधिकाऱ्यांना सध्याची असणारी शिक्षण पद्धती मान्य नाही. कोणाच्या सुपिक डोक्यातून कल्पना बाहेर पडली कोणास ठाऊक पण आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापासच करायचे नाही. त्यामुळे कितीतरी पिढ्या बरबाद झालेल्या पहावयास मिळत आहे. या उलट ज्यांना शिक्षणाची जाण आहे. त्यांची मुले वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीत व संकुलात शिक्षण घेतात. तिच पुढे स्पर्धा परिक्षात प्रथम असताना दिसतात.
ग्रामीण भागात चुकीच्या पद्धतीमुळे मुलांमध्ये परिक्षांचा न्युनगंड तयार झाला आहे. देवाने प्रत्येकाला सारखी बुद्धी दिली आहे. तिचा वापर कसा करायचा हे ज्याने त्याने ठरवायचे असते. सध्या असणारी शिक्षण पद्धती चे परीणाम तुमच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे तुमचे पायाभूत शिक्षण संपुष्टात येऊ लागले आहे. २० टक्के मोफत दिलेले मार्क यातून १५ टक्के फक्त यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न विद्यार्थ्यांना करावे लागतो. त्यामुळे पास होणे सोपे झाले आहे. पण गुणवत्ता ही अशी गोष्ट आहे की ती तुमचे करियर घडवते. १० आणी १२ हे वय तुमच्या करियर ठरविण्याचे वय आहे.
प्रत्येकजण स्पर्धा परिक्षा म्हणेल हे शक्य नाही. तुम्ही तुमच्या कुवतेप्रमाणे करियर निवडले पाहिजे. त्यासाठी आत्मनिरीक्षण करणे गरजेचे आहे. समाजात न्युनगंड निर्माण करून घेऊ नका. सगळ्यांना बुद्धी सारखी दिली जाते. समाजात दहावी बारावीला नापास झालेले आत्मपरिक्षणातून अधिकारी पर्यंत पोहचले आहेत. तुम्ही फक्त स्वप्न पाहू नका. यश मिळविण्यासाठी संघर्ष करा. त्यातून तुम्हाला जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळणार आहे.
परीश्रमाशिवाय तुम्हाला काहिच साध्य होणार नाही. गरीब असल्याने तुम्हाला यश मिळणार नाही. असे नाही.सध्या शिक्षण पुर्ण करण्यासाठी गूगलवर सर्च करून पहा. शासनाने विद्यार्थ्यांना होस्टेल पासून शिक्षण घेण्यापर्यंत कर्ज देण्याच्या योजना दिल्या आहेत. त्यातून शिक्षण घ्या. समाजामध्ये सोशल मिडीया, मोबाईल यासारख्या साधनापासून दूर रहा. तुम्ही वाचाल तर वाचाल हे मात्र लक्षात ठेवा.
शब्दांकन : युनूस तांबोळी