-बापू मुळीक
सासवड : कोणतीही संस्था, कारखानदारी माझ्याकडे नाही. परंतु सर्वसामान्य, गोरगरीब जनता अशा माझ्या तळागाळात अडकलेल्या व्यक्तींना मदत करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. मला कुठलेही पद, काम केले आहे, असा कोणताही गवगवा नाही. तर पुरंदर हवेलीच्या प्रत्येक सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या, सुखदुःखात सदैव मी पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे व इथून पुढे सुद्धा उभा राहीलच असा विश्वास, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी व्यक्त केला. पुरंदर मधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेळाव्यातून ते बोलत होते.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सभागृह या ठिकाणी ‘भव्य कार्यकर्ता मेळावा’ संपन्न झाला. यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पुरंदरमध्ये विलास खेसे, जयश्री भोईटे, अॅडव्होकेट शिवाजी कोलते, महेश राऊत, नाना जोशी, संदीप होळकर, राजेंद्र भिंताडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जगदाळे म्हणाले, एखाद्या व्यक्तीची बदली, तसेच एखाद्याच्या नोकरीसाठी, कामासाठी, सर्वसामान्य जनतेकडून कधीही पैसा घेतला नाही व इथून पुढे सुद्धा घेणार नाही. फक्त त्यांना न्याय कसा द्यायचा यासाठी मी सदैव प्रयत्न करत आहे आणि करत राहणार आहे. कोणतेही काम केले ते कधीही मी सांगत नाही, मी हे काम केले, मी ते काम केले यामुळेच सर्वसामान्य जनता ही धाडसी नेतृत्व म्हणून विधानसभेत पुरंदर हवेलीतून निवडणूक लढवावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. व त्यासाठी कात्रज दूध संघाचे संचालक म्हणून 17 वर्षे काम केले. तर त्या काळात 40 ते 50 हजार लिटर दूध पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे जाऊ लागले. युवकांना, शेतकऱ्यांना एक प्रकारचा चांगला व्यवसाय पूरक मिळवून दिला. दूध डेअरी काढताना कोणता कार्यकर्ता बघितला नाही. येईल त्याला पूर्णपणे न्याय देण्याचे कामाच्या स्वरूपातून दिला. मिलिटरीत नोकरी लागली असताना सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करण्याची निश्चितच संधी मला करावी लागली. यापुढे सुद्धा जनतेची व गोरगरिबांची सेवा करणार आहेच. दादा जाधवराव यांची एक शिकवण आहे की, गोरगरीब जनता, महिला, सर्वसामान्य नागरिकांचे, शेतकरी यांच्यावर अन्याय झाला, तर त्यांना न्याय देण्यासाठी एक शिष्य म्हणून गंगाराम जगदाळे यापुढे सुद्धा सक्षमपणे खंबीर उभा राहील, असे गंगाराम जगदाळे यांनी भव्य कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्वांना आपले विचार व्यक्त करताना सांगितले.
यावेळी गंगाराम जगदाळे ,नाना जोशी, राजेंद्र भिंताडे, सागर (आबा) जगताप, गिरीश जगताप ,साकेत जगताप, दयानंद फडतरे, महेश राऊत, एडवोकेट शिवाजी कोलते,एडवोकेट स्वप्निल होले, गजानन जगताप ,अरुण चौधरी, विलास खेसे, जालिंदर जगताप, समीर तरवडे, प्रफुल्ल जगदाळे, हनुमान काळाणे, वैशाली पवार, जयश्री भोईटे, रोहित खवले, आयोजीत दिवे गराडे जगदाळे मित्र युवा मंचाचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक ,महिला मंडळ ,युवक ,युवती व पुरंदर तालुक्यातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास खेसे यांनी केले .सूत्रसंचालन रवी फुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन सूर्यकांत रणवरे यांनी मानले