Tuesday, June 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: लोहगावात बंद सदनिकेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह; आत्महत्या की खून? तपास सुरू

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 14:01
Man died who is beaten by known people pune

Pune News: वडगाव शेरी : लोहगाव परिसरातील एका बंद सदनिकेत पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर पत्नीचा मृतदेह बेडवर होता. या दोघांनी आत्महत्या केली, की खून झाला, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, किरण महादेव बोबडे (वय २३), आरती किरण बोबडे (वय २०, दोघे राहणार रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव) अशी दोघांची नावे आहेत. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील लोहगाव वडगाव शिंदे रोड लेक व्हिव सिटी या सोसायटीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोबडे दाम्पत्य राहात असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे घरमालक प्रशांत यादव यांच्या सोमवारी (ता. ६) निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बोबडे यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता, किरणचा मृतदेह छताच्या हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तर पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत आढळली. पत्नीचा मृतदेह सडण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, शनिवारी सकाळपासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

पंचनाम्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. किरण हे पोस्टात कंत्राटी नोकरी करत होते. ते मूळचे माजलगाव बीड येथील रहिवासी आहेत. तर आरती या येरवड्यातील असून, एका खासगी बँकेत नोकरीला होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. गेल्या पाच महिन्यांपासून ते या घरात भाड्याने राहत होते.

लोहगाव परिसरातील एका सदनिकेत पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कारण समोर येईल.
– आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई! दौंड परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

Monday, 29 June 2026, 22:59

पुण्यातील वाहतुकीत मोठा फेरबदल! पालखी प्रस्थानामुळे कोणता रस्ता होणार बंद आणि कोणता खुला? जाणून घ्या

Monday, 29 June 2026, 22:28

महाराष्ट्र हादरला! एक महिला अन् 14 जण; शेतात आळीपाळीने शरीराचे लचके तोडले, अत्याचाराचा व्हिडीओ शूट करत व्हायरल केला अन्…

Monday, 29 June 2026, 22:25

एसटी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! उत्पन्न वाढीसाठी मंत्र्यांचा एक महिन्याचा कडक अल्टिमेटम

Monday, 29 June 2026, 21:40

वटपौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला! पंढरपूरमध्ये विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

Monday, 29 June 2026, 20:58

शिरूरमध्ये डॉक्टरचा कारनामा! ड्युटीवर असतांना दारू पिऊन घातला रुग्णालयात गोंधळ; गुन्हा दाखल

Monday, 29 June 2026, 20:29
Next Post

Pimpri News : उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण : राम राजमाने

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.