Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण : राम राजमाने

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 7 November 2023, 16:04

पिंपरी : “स्वच्छता कर्मचाऱ्यांसारख्या उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण आहे,” असे गौरवोद्गार पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सोमवारी (ता. ६) पिंपरी येथील संत तुकारामनगरमधील सोहम् सार्वजनिक ग्रंथालयात आयेजित कार्यक्रमात बोलताना काढले.

ग्रंथालयाच्या वतीने दीपावलीनिमित्त संत तुकारामनगर येथील ‘ह’ प्रभागातील कचरावेचक आणि स्वच्छतादूत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना राजमाने बोलत होते. माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा धर, सुजाता पालांडे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती मायला खत्री, संत तुकारामनगर येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण सुवर्णा, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, भारतीय युवा काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी ज्योत्स्ना जाधव, तुळसाबाई प्रधान, खाजाप्पा गायकवाड, रेखा साळवे, संगीता भिसे, पारू पवार यांना नवीन कपडे, सुकामेवा आणि मिठाई प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याचबरोबर ग्रंथालयाचे सदस्य गौरव चौधरी यांची भारतीय युवक काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्टपदी तसेच ‘यंग इंडिया के बोल-सीजन ४’साठी गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

या वेळी डॉ. सुलक्षणा धर म्हणाल्या की, “सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाची मी सदस्य असल्याचा मला खूप अभिमान वाटतो; कारण पंचवीस वर्षांहून अधिक काळ या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यश संपादन केले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सुमारे २६००० पुस्तके असलेले समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत अभ्यासिका, शांत वातावरण यामुळे वाचक पुस्तकांशी लगेच समरस होतो.”

राम राजमाने पुढे म्हणाले की, “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे येथील विद्यार्थी खूप नशीबवान आहेत. त्यांना पुस्तकांसह अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. अलीकडे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमधील यशाची टक्केवारी वाढली आहे, ही स्तुत्य बाब आहे.” दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून, “आपण थोडा वेळसुद्धा दुर्गंधी सहन करू शकत नाही. अशावेळी स्वच्छता कर्मचारी दररोज निष्ठापूर्वक आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे ते सन्मानास पात्र आहेत,” अशी भावना व्यक्त केली. वर्षा बोरसे आणि ग्रंथालयातील कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरव चौधरी यांनी आभार मानले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
otherwise OBC will not vote for Maratha candidate

ओबीसींचे आरक्षण हडप करण्याचे षडयंत्र हाणून पाडणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.