उरुळी कांचन, (पुणे): मानव अधिकार संरक्षण समिती हवेली तालुका उपनिरीक्षक पदी उरुळी कांचन येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अभिषेक धनंजय कांचन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उरुळी कांचन शहराध्यक्षपदी अखिल राजेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष भगवान दाठीया, प्रदेश जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्य मानव अधिकार संरक्षण समितीचे सचिव शरद म्हस्के यांच्या हस्ते दोघांनाही हे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक कार्याची दखल घेऊन व केलेल्या कामाची पाहणी करून मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या कमिटीने अभिषेक कांचन व अखिल जाधव यांची नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे विविध क्षेत्रांतून दोघांचेही अभिनंदन होत आहे. समितीमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय मानव अधिकार आयोग ही 28 सप्टेंबर 1993 च्या मानव अधिकार संरक्षण अध्यादेशानुसार 12 ऑक्टोबर 1993 रोजी स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था आहे. त्याला मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 द्वारे वैधानिक आधार दिला गेला. हे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जबाबदार आहे. व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित अधिकार आहेत. जे राज्यघटनेद्वारे हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये मूर्त स्वरूप असलेले आणि भारतातील न्यायालयांद्वारे लागू करण्यायोग्य असे आहे.
याबाबत बोलताना अभिषेक कांचन म्हणाले, “दिलेल्या पदाचा वापर सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी करणार आहे. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी तत्पर असणार आहे.