Hsc Result उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष २०२२-२३ एच. एस. सी. विज्ञान शाखेच्या परीक्षेचा अंतिम निकाल ९८.५८ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी १४१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १३९ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (Hsc Result)
पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा…
विद्यार्थीच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव अजिंक्य कांचन, संचालक. डॉ. अप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य रोहिणी जगताप, उपप्राचार्या चव्हाण, विभाग प्रमुख. प्रा. परभणे सर, संपूर्ण स्टाप यांनी विद्यार्थांचे अभिनंद केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Hsc Result)
दरम्यान, जुनियर कॉलेजमधील विज्ञान शाखेची बैच असताना देखील ९८. ५८ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उरुळी कांचनसह परिसरातून कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाविद्यालयात प्रथम तीन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
ऐश्वर्या अशोक देवकाते ७७.१७ टक्के, अस्मिता सुनील दोरगे ७५.३३, समृद्धी सचिन सातव ७४.१७ टक्के.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
HSC Result : पंचगणी इंटरनॅशनल हायस्कूलचा बारावीचा निकाल शंभर टक्के..
HSC Result | लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल ८६.८९ टक्के