पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने विकसित केलेल्या भोसरीतील सेक्टर क्रमांक १२ मधील गृह प्रकल्प योजनेच्या ई नोंदणी केंद्राचा शुभारंभ महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते आज सोमवारी (ता.६) करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर, पीएमारडीएचे सह आयुक्त बन्सी गवळी, नोंदणी उप महानिरीक्षक दीपक सोनवणे, पुणे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे उप महानिदेशक अजय जोशी, वरिष्ट संचालक ( आय टी ) संजय कोतकर, प्रोबिटी सोफ्टवेअरचे संचालक जितेंद्र जोशी, उप जिल्हाधिकारी तथा जन संपर्क अधिकारी रामदास जगताप, शिल्पा करमरकर, उप जिल्हाधिकारी तथा पीएमआरडीए चे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने विकसित केलेय या गृहयोजनेत सुमारे ४८०० घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यातील सुमारे ४ हजार सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात आले आहे. या सर्व सदनिकांच्या दस्त नोंदणीसाठी प्राधिकरणाच्या वतीने हे ई नोंदणी केंद्र नोंदणी महानिरीक्षक यांचे सहकार्याने सुरु केली आहे. सदरची ई रजीस्ट्रेशनची प्रणाली एनआयसी पुणे यांनी विकसित केलेली असून त्यामुळे दररोज सुमारे १०० ते १५० सदनिकांची नोंदणी करणे शक्य होणार आहे.