पुणे : भारतीय निवडणूक आयोगाद्वारे पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघात मंगळवारी (ता. 07 मे) मतदान होणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघ या कार्यकक्षेत येणाऱ्या न्यायालयांना व त्यांच्या कार्यालयास 7 मे ला तसेच पुणे लोकसभा मतदार संघ, मावळ लोकसभा मतदार संघ आणि शिरुर लोकसभा मतदार संघ, येथे सोमवारी (ता. १३ मे) मतदान होणार असल्याने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाकरीता जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीच्या बदल्यात दुसऱ्या शनिवारी 22 जूनला हा दिवस न्यायालयीन कामाकाजाचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, उपरोक्त दिनांकाव्यतिरीक्त ज्या न्यायीक अधिकारी, कर्मचारी यांचे मतदान इतर जिल्ह्यात, लोकसभा मतदार संघात असेल तर त्यांनी मतदानाच्या दिवशी, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सवलत अनुज्ञेय राहील, त्यासाठी त्यांनी सुट्टीचा अर्ज मतदान ओळखपत्राची चित्रछायांकीत प्रतीसह संबंधीत कार्यालयात सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.