पुणे : हिट अँड रन केस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आता जर खासगी बसचा अपघात झाला. तर, बस मालक जबाबदार असणार असल्याचा कायदा लवकरत येणार अशी शक्यता आहे. याआधी ट्रक चालकाकडून अपघात झाल्यास चालकावर कारवाई करण्याचा कायदा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. त्यावर तेल कंपन्यांच्या ट्रक चालकांनी संप केला होता. त्यात आता खासगी बसचा अपघात झाल्यास बस मालकही जबाबदार असेल असा कायदा करण्यात येणार आहे.
खासगी बसचा अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार आहे. भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही टाकणारा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. बस मालक चालकाला आठ-दहा तास गाडी चालवण्यास भाग पाडतात. तसेच नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्या जातात. यामुळे या पद्धतीचा कायदा आणण्याचा हालचाली सुरु आहेत.
देशभरात खासगी लक्झरी बसची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. या गाड्या रात्रीच्या वेळी धावत असल्याने अपघात झाल्यास अनेक प्रवाशांचा बळी जातो. आतापर्यंत या अपघाताला केवळ चालकालाच दोषी ठरवले जात होते. मात्र यात मालकाचाही तितकाचे गोष असतो. नादुरुस्त गाडी, ओव्हरलोड गाडी चालकाला चालवण्यास मालकवर्ग भाग पाडतो. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे.
राज्यात 80 हजारहून अधिक खासगी लक्झरी बस धावतात. त्यामुळे मालकांना दररोज लाखो रूपयांचा नफा मिळतो. परंतु चालकाला यात मासिक15 ते 20 हजार रुपयेत मिळतात. त्यातही चालकाला आठ-दहा तास गाडी चालवावी लागते. आता मालकाला जबाबदार धरल्यास असे होणार नाही.
नवीन कायद्यात मालकावर जबाबदारी टाकल्यास बस सुस्थितीत राहणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतो, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली. अनेकदा एक चालक गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिवहन विभाग एक स्वतंत्र अॅप तयार करत असून प्रत्येक नोंदणीकृती बसच्या चालकाने तो किती वाजल्यापासून गाडी चालवणार आहे, याची माहिती आधी परिवहन विभागाच्या अॅपवर लायसन्स क्रमांकासह भरणे बंधनकारक असणार आहे.