Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी; राज्यात तब्बल ३० हजार पदांवर भरतीची घोषणा!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 13:24

पुणे : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून, काही जिल्हा परिषदांनी संकेतस्थळावर पदभरतीची जाहिरात दिली आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या ३० हजार पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३० हजार पदे भरण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती. ही ३० हजार पदे म्हणजे रिक्त पदांपैकी केवळ ७० टक्के पदे आहेत. राज्यातील खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत. रिक्त पदांसाठी तयार करण्यात आलेल्या रोष्टरबाबत काही आक्षेप आहेत. त्यामुळे १० टक्के जागा न भरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या केवळ रिक्त पदांपैकी ७० टक्के पदांची जाहिरात काढली जाणार आहे. या जागाही ३० हजारांच्या जवळपास आहेत. यामुळे दीर्घ कालावधीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती सुरु करण्यात आली आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चार शिक्षकांची पदे मंजूर असताना एक शिक्षक शाळा चालवत आहे. पहिली ते चौथीचे वर्ग एक शिक्षकच चालवत असल्याची अनेक उदाहरणे आढळत आहेत. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विचारात घेऊन शिक्षक संघटनांकडून अनेक वेळा भरतीची मागणी करण्यात आली होती. अखेर आता जिल्हा परिषद, नगर परिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांची भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या भरतीसाठी या शाळांमधील रोष्टरची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. तसेच खासगी संस्थाच्या रोष्टरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या १० दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर संबंधित संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नेमक्या किती शिक्षकांची भरती होणार, हे स्पष्ट होणार आहे.

 

दरम्यान, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यानंतर जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या जाहिरातीसंदर्भात शिक्षक भरतीने आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीत इंग्रजी माध्यमांमधील मुलांना झुकते माप दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर शिक्षक भरतीच्या आरोपावर अधिकार्‍यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आतापर्यंत निम्म्याच जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या आहेत. आणखी जिल्हा परिषदांच्या जाहिराती लवकरच येणार आहेत. भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी असणार आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

हिट अँड रन प्रकरणी 9 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये चक्काजाम; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.