Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मदत करा, दरोडा, दरोडा म्हणत मदतीसाठी व्यावसायिकाने मारली हाक, पण दरोडेखोर लाखोंचा ऐवज घेऊन निसटले, पिंपरी-चिंचवडमध्ये थरकाप

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 20 July 2025, 9:02

पुणे: पिंपरी-चिंचवड शहराला एका भीषण घटनेने हादरवून सोडले आहे. निगडी प्राधिकरणात राहणाऱ्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरात मध्यरात्री ४ ते ५ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्यांनी व्यावसायिका चंद्रभान अग्रवाल यांना बांधून कोंडून ठेवले, मात्र अग्रवाल यांनी दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला. लाखोंचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चंद्रभान छोटूराम अग्रवाल हे त्यांच्या बंगल्यात एकटेच होते. हॉलमध्ये बसले असताना मुख्य दरवाजा उघडा राहिला. याच संधीचा फायदा घेऊन ४ ते ५ सशस्त्र हल्लेखोर घरात घुसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अग्रवाल आणि त्यांच्या नोकरांना पकडले. त्यांचे हातपाय बांधून त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कोंडून ठेवले. दरोडेखोरांनी घरात ठेवलेली रोकड आणि इतर लाखो रुपयांचा ऐवज गोळा करण्यास सुरुवात केली.

 

दरोडेखोरांनी आपल्याला बांधून ठेवले असतानाही चंद्रभान अग्रवाल यांनी हिंमत हारली नाही. त्यांनी अतिशय शिताफीने आपल्या हातातील गाठ सैल करून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर, त्यांनी गॅलरीमध्ये धाव घेतली आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला. गॅलरीत उभे राहून त्यांनी जीवाच्या आकांताने ‘मदत करा, दरोडा, दरोडा…!’ अशा हाका मारण्यास सुरुवात केली.

अग्रवाल यांचा मदतीसाठी ओरडत असल्याचा एक व्हिडिओ देखील लगेच व्हायरल झाला. हा थरारक व्हिडिओ पाहून परिसरातील शेकडो नागरिक आणि तरुण त्यांच्या मदतीला धावले. मात्र, दरोडेखोरांकडे शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्याने कोणीही घरात शिरण्याची हिंमत केली नाही. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊनही, सशस्त्र पोलीस दल घटनास्थळी पोहोचायला बराच वेळ लागला. तोपर्यंत दरोडेखोर चोरीचा माल घेऊन अंधाराचा फायदा घेत तिथून पसार झाले होते.

रात्री उशिरापर्यंत अग्रवाल यांच्या बंगल्यासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता आणि शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. दरोडेखोर कोण होते आणि यामागे कोणाचा हात होता, याबाबतची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News : दोन रुपयांची बिडी न दिल्याने मजुरावर चाकूने वार; मोशीतील धक्कादायक घटना

Wednesday, 6 May 2026, 19:17

Junnar News : जुन्नरमध्ये भावांमध्ये रक्तरंजित वाद! रस्त्याच्या कारणावरून हाणामारी; डोक्यात दगड लागल्याने मोठा भाऊ गंभीर

Wednesday, 6 May 2026, 19:08

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर ३१ मेपासून पुन्हा खुले! नव्या सुविधांसह भाविकांना सुलभ दर्शनाची संधी

Wednesday, 6 May 2026, 18:49

Leopard News : आंबेगावात बिबट्याचा थरार! भरधाव दुचाकीवर झेप; तरुण जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 6 May 2026, 18:26
Loni Kalbhor News: Serious negligence in duty! Loni Kalbhor's Village Revenue Officer Balasaheb Oneway suspended

Pune Police Bribe News : पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन! गुटखा कारवाई टाळण्यासाठी ४ लाखांची लाच; दोन पोलिसांवर कारवाई

Wednesday, 6 May 2026, 18:00

BIG BREAKING : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

Wednesday, 6 May 2026, 17:24
Next Post

पुणे: महिलेवर बलात्कार, पतीने संशय घेऊन घराबाहेर हाकलले; पण पोलिसांनी तत्परता दाखवत २४ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.