पिंपरी : मोशी परिसरात किरकोळ कारणावरून घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन रुपयांची बिडी न दिल्याच्या रागातून एका मजुरावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास ऐश्वर्यम हमारा लेबर कॅम्प येथे घडली. Pune News

यासुद्दीन सादिक मियाँ अन्सारी (वय २४, रा. मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रिदय ऊर्फ राहुल विकास मंडल (वय १९, सध्या रा. मोशी, मूळ भोपाळ, मध्य प्रदेश) असे जखमी मजुराचे नाव आहे. याबाबत राहुल मंडल यांनी मंगळवारी (दि. ५ मे) पोलिसांत फिर्याद दिली आहे. Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्याचे मित्र खोलीत जेवण करत असताना आरोपी अन्सारी तेथे आला. त्याने राहुलकडे दुसऱ्यांदा बिडी मागितली, मात्र राहुलने ती देण्यास नकार दिला. याच कारणावरून आरोपी संतापला आणि शिवीगाळ करत अचानक चाकू काढून राहुलवर हल्ला केला.
दरम्यान, या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. Pune News







