Health News : पुणे : लाल-लाल बिट हे जसं दिसते तसाच त्याचा फायदाही आहेच. बिटाचा रस आरोग्यासाठी चांगला मानला जातो. या रसात अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, मिनरल्स, मॅग्नेशियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडिन आणि अन्य व्हिटॅमिन्सची भरपूर मात्रा आहे. त्यामुळे बिटाच्या रसात लिंबू आणि आलं घालून त्याचं नक्की सेवन करावे. Health News
हाय बीपीवर प्रभावी
हे नैसर्गिक पेय आहे. हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी ते प्रभावी ठरते. यातील नायट्रेट कम्पोनंट रक्त वाहिन्यांना रुंद करण्यासाठी प्रभावी ठरते. इतकंच नाही, तर रक्त शरीराच्या प्रत्येक अंगापर्यंत पोहोचवण्यासाठी हा रस उपयुक्त ठरतो. तसेच बिट आणि त्याचा रस केल्यास उत्तम आहे. हे पेय मेंदूपर्यंत रक्त पोहोचवते. त्यामुळे रक्त गोठत नाही. व्यक्तीचा स्ट्रोकपासून बचाव होतो.
प्रतिकारशक्तीत वाढण्यास फायदेशीर
हर्बल असलेल्या या पेयात पोषण आणि अँटीऑक्सिडंट आहेत. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक कोशिकेपर्यंत रक्ताभिसरण होते. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. परिणामी, आजारांपासून बचाव होतो. याशिवाय, बीट, लिंबाचा रस आणि आल्याचा रस रोज घेतल्यानं चेहऱ्यावर तजेला येतो. त्वचेच्या कोशिकांना पोषण मिळते. त्यामुळे बिटाचा रस रोज घेणे हिताचे ठरते. इतकेच नाहीतर पोटातील अॅसिड लेव्हल कमी करण्यासाठी बिटाचा रस लाभदायक ठरतो. त्यामुळे अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळते. Health News