हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. उमेदवारी अर्जा सादर करतानाचा उमेदवारांचा उत्साह दिसून आला आहे. त्यामुळे या निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांकडून मजबूत बांधणी करण्यात येवून प्रसाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. या तयारीत भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह सर्वच पक्षाचे उमेदवार असलेल्या नेत्यांनी मात्र बाजार समितीचे संस्थापक अण्णासाहेब मगर यांच्या नावाने “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” या नावाने सर्वपक्षीय अधिकृत पॅनेल जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून गणली जाते. पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. पक्षीय पातळीवर पुणे जिल्हाच्या सहकारातील किंग समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे पॅनेल अद्याप जाहीर झालेले दिसून येत नाही.
भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह सर्वच पक्षाचे उमेदवार असलेल्या नेत्यांनी, या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप आण्णा गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते के. डी. कांचन, राजेंद्र टिळेकर, पांडुरंग खेसे, पंढरीनाथ पठारे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, विकास दांगट, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठी सोसायटी व ग्रामपंचायत गटातून पंधरा जणांची घोषणा करुन, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सुरुवातीला तर कुरघोडी करण्यात यश मिळवले असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्याच गटाची सत्ता यावी यासाठी, मागील दोन महिण्यापासुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ताकद लावली आहे.
तर पवार यांचे बाजार समितीवर सत्ता मिळवण्याचे मनसुबे उधळुन लावण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक व माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक विकास नाना दांगट, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह हवेलीच्या तालुक्याच्या सहकारातील अनेक दिग्गज नेत्यांनी पंधरा जणांचे सर्वपक्षीय अधिकृत पॅनेल जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली आहे.
सर्वपक्षीय पॅनेलकडे सहकारातील अनेक दिग्गज नेते असल्याने “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” ने पहिल्या टप्प्यातच पुर्ण क्षमतेने प्रचाराला सुरवात केली आहे. हवेली तालुक्यातील दिग्गज नेते बाजार समितीची सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आल्याने व सर्वच नेत्यांनी पैशापेक्षाही आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने, बाजार समितीची निवडणुक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे मागील दोन महिण्यापासुन विरोधी पक्षनेते अजित पवारही बाजार समिती आपल्याच हातात रहावी यासाठी पडध्यामागुन राजकीय हालचारी करत आहेत. मात्र पॅनेलमध्ये नेमके कोणाला घ्यायचे व कोणाला बसवायचे याबाबत एकमत होत नसल्याने, राष्ट्रवादीचा पॅनेल जाहीर होऊ शकलेला नाही. राष्ट्रवादीसह कॉग्रेस कडुन निवडणुकीसाठी अनेक जणांनी निवडणुक लढण्याचे मनसुबे जाहीर केल्याने, राष्ट्रवादी बॅकफुटला गेल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पॅनेल जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
बाजार समितीसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या प्रवर्गामधून ११ संचालक निवडून द्यावयाचे आहेत, त्यासाठी १८५२ मतदार आहेत. ग्रामपंचायत गटामधून चार जागा निवडून द्यायच्या आहेत. आडते व्यापारी मतदारसंघातून दोन जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यासाठी १३ हजार ९७४ मतदार आहेत. तर हमाल तोलणार गटामधून एका जागेसाठी २ हजार ७ मतदार आहेत. जिल्हा सहकार उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे.
“अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे
(सोसायटी मतदार संघ) रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड (इतर मागास प्रवर्ग), लक्षमण साधू केसकर (भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग).
मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे (महिला प्रतिनिधी प्रवर्ग) . सुदर्शन जयप्रकाश चौधरी, शुक्राचार्य हिरामण वांजळे, रवींद्र नारायणराव कंद, सत्यवान दगडू गायकवाड (ग्रामपंचायत मतदार संघ).
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Market Committee Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ३०१ अर्ज दाखल..!