Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti | महामानव डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रम सुरू…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 April 2023, 17:25

अजित जगताप

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti | सातारा : घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणी व संघर्षाने अनेकांना आपल्या हक्काची जाणीव झाली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर काहींनी जागोजागी हार्दिक शुभेच्छा फलक लावून तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजनाची सुरुवात करून महामानवाला अभिवादन केले आहे.

सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजधानी होती. आज ही क्रांतिकारक विचार जोपासले जात आहेत. दि. ७ नोव्हेबर १८९६ रोजी बाल भिमाने म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील तात्कालीन सातारा हायस्कूल मध्ये शाळा प्रवेश केला होता. तसेच अनेकदा सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी भेट दिली आहे. शेड्युल कॉस्ट फेडरेशन व स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून साताऱ्यात त्याकाळी आमदार खंडेराव सावंत हे निवडून आले होते.

 

त्यानंतर आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाचे एक ही नेते आमदार होऊ शकले नाही. परंतु, इतरांना आमदार करण्यासाठी काही दलित व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले आहे. आज ही इतर पक्षाच्या अजेंट्यावर काही महाभाग अद्याप ही काम करीत आहेत. त्यांनी ही जागोजागी फलक लावून सहभाग नोंदवला आहे.

विश्र्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व खेड्यापाड्यात जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण, प्रबोधनात्मक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, व्याख्याने, भव्य मिरवणूक व सांस्कृतिक व सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एक महिना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महोत्सवानिमित्त समता, बंधुता, लोकशाहीचा गजर खेड्यापाड्यात केला जातो. यासाठी अनेक बांधव मोठ्या संख्येने सहकार्य करीत असतात. सामाजिक एकोपा निर्माण झाला आहे.

अलिकडच्या काळात वाढत्या प्रभावाने डिजिटल जुगलबंदीतून जागोजागी फलक, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा लावून विनम्र अभिवादन करून काही जण आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तर काही कार्यकर्ते वैचारिक बांधिलकी स्वीकारून विविध विधायक उपक्रम राबवण्यात धन्यता मानत आहेत. त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

‘या निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हावे’…

”या निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हावे’ हे भीम गीत वाजविले जाते. पण, अनेक ठिकाणी गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे दिसून येत आहे. आज सातारा जिल्ह्यातील सुमारे दीड हजार ठिकाणी विनम्र अभिवादन फलक लावून महामानवाला अभिवादन करण्यात आले आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या प्रभाव सुद्धा दिसून आला आहे. त्याचे मतांमध्ये रुपांतर होणे अपेक्षित आहे असे स्पष्ट मत दलित पँथरचे कार्यकर्ते तसेच सामान्य फुले, शाहू, आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी झटणारे जुने कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करत जगा. हा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र दिशा दिली आहे. त्या मार्गाने आगेकूच करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने काही महत्वाच्या सामाजिक संघटना काम करीत आहेत. चांगली विचार जोपासले जात आहेत. अशा पद्धतीने होणाऱ्या जयंती महोत्सवाला सुरुवात झाली असून त्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांचा पाठिंबा मिळू लागला आहे.

हा क्रांतिकारक बदल सुद्धा पहाण्यास मिळत आहे. दिवसेंदिवस जयंती महोत्सवानिमित्त लोकांची संख्या वाढत आहे. अशा वेळी काही राजकारणी मंडळी सुद्धा सहभागी होताना दिसत आहे. त्यांचे ही स्वागत करण्यात येत असून काहींनी तर नेत्यांची छबी लावूनच फलकबा जी केली आहे. तो सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Satara News : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! गारपीट व अवकाळी पावसाचा फटका, निर्यातीसाठी सज्ज द्राक्ष भुईसपाट

Pune News : मुस्लीम महिलांना पुण्याप्रमाणेच देशभरातील मशिदीत जाऊन नमाज पठण करु द्या  सर्वोच्च न्यायलयाकडे दाम्पत्याची मागणी

Pimpri Chinchwad Crime : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; देहुफाटा येथील प्रकार

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ! अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलची प्रचारात आघाडी ; राष्ट्रवादीचेही पॅनेल लवकरच होणार जाहीर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.