दीपक खिलारे
Harshwardhan Patil | इंदापूर : इंदापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रविवारी (ता.१९) उत्साहात संपन्न झाले. आगामी लोकसभा, विधानसभेसह सर्व निवडणुका ताकदीने जिंकण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी या शिबिरात व्यक्त केला.
केंद्र व राज्याच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार व प्रसाराचे काम प्रभाविपणे भाजप कार्यकर्ता करीत आहे. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिबिर समाप्तीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
भाजपची निवडणूक तयारी सुरू…
या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी व केशव उपाध्ये, माजी आमदार मेधा कुलकर्णी, पुणे शहर भाजपचे माजी योगेश गोगावले व भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर कार्यकर्त्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. इंदापूर तालुक्यातील भाजपचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पक्षाचे व मोर्च्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष डॉ. जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली भाजप राज्यात व देशात मजबूत झाला आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा भाजप हा जगातील हा सर्वात मोठा पक्ष आहे. असे पाटील यांनी सांगितले.तसेच इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आमदार फंड सोडून इतर विकास कामे शिवसेना-भाजपची – हर्षवर्धन पाटील
राज्यात आता शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून, इंदापूर तालुक्यात मंजूर झालेली सर्व विकासकामे केंद्र व राज्य सरकारची असून शिवसेना-भाजप मार्फत मंजूर झालेली आहे. त्यामुळे आमदार फंड सोडून इतर विकास कामांचे श्रेय इंदापूर तालुक्याच्या विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकप्रतिनिधीने घेऊ नयेत, असा टोला यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आ.भरणे यांना लगावला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Indapur Crime : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या ; वालचंदनगर पोलिसांची कामगिरी..!
Indapur News : इंदापूर महाविद्यालयात शैक्षणिक धोरण चर्चा सत्र संपन्न