उरुळी कांचन, (पुणे) : हवेली तालुका प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेची सुसंवाद बैठक उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हॉटेल जानाई या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील ध्येयधोरणे, संघटनेच्या सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, सभासदांकडून आलेल्या विविध सुचनांचा उहापोह करुन सर्व संमतीने नवीन कार्यक्रम आयोजित करणे, सभासद व पदाधिकारी यांच्या संमतीने उपस्थित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
संघटनेचे जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे यांच्या साप्ताहिकाला आरएनआय मिळाल्याबद्दल तसेच भाऊसाहेब महाडिक यांनी 25 ऑक्टोंबरला प्रसिद्ध होणारा मराठी चित्रपट ‘नाद’ या चित्रपटात छोटीसी भूमिका साकारली आहे. याबद्दल दोघांचेही संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रिंट व डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, तालुकाध्यक्ष संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, ज्येष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर, तुकाराम गोडसे, सचिन सुंबे, चंद्रकांत दुंडे, अमोल अडागळे, जितेंद्र आव्हाळे, जयदीप जाधव, रियाज शेख, सुखदेव भोरडे, शहाजी नगरे, अमोल भोसले, भाऊसाहेब महाडिक, गोरख कामठे, हनुमंत चिकणे, सुधीर कांबळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत बोलताना प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापू काळभोर म्हणाले, “माध्यमांच्या बदलत्या स्वरूपानुसार पत्रकारांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे. तेव्हाच या स्पर्धेच्या युगात ते तग धरू शकतील. प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ हा पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हवेली तालुका अध्यक्ष संदीप बोडके यांनी मानले.