युनूस तांबोळी
शिरुर – शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा १५ टक्के लाभांश देण्यात आला. या लाभांशचे वितरण घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विश्वास सरोदे यांनी दिली.
आजपर्यंत संस्थेची सभासद संख्या ३५७ एवढी असून भाग भांडवल १६ लाख ६४००० रूपये इतके आहे. संस्था निधी १३ लाख ०४५८१ रूपये असून तर सभासदांना १ कोटी८९ लाख,२२०००हजार रूपये कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच संस्थेचे वसुलीचे प्रमाण चांगले असून ते ८५% इतके आहे. त्यामुळे संस्थेला १६ लाख २९ हजार ६९४ रूपये नफा प्राप्त झालेला आहे. संस्थेने आयोजीत केलेल्या सर्वसाधारणसभेत सर्व संचालकमंडळाने एकमताने १५ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात आला. संस्थेने वाटप केलेल्या १५%लाभांशामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होवून सभासदांची दिवाळी गोड झाली असल्याचे असे संस्थेचे सचिव कुशाभाऊ जोरी यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक वसुदेव सरोदे, उपाध्यक्ष संगिता सरोदे, जांबूत सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, सरपंच दत्तात्रय जोरी, उपसरपंच विठ्ठल सरोदे, माजी उपसरपंच, गणेश सरोदे, लक्ष्मण सरोदे, डॉ.बिभिषण औटी, बाबाजी जोरी, सुभाष सरोदे, पोपट सरोदे व सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष वसुदेव सरोदे यांनी तर सुत्रसंचालन अशोक गांजे यांनी केले व जनार्दन सरोदे यांनी आभार मानले.