Hadapsar News : हडपसर : जीवनाचे सर्वात मोठे आणि अंतिम सत्य म्हणजे मृत्यू… मात्र, एखाद्याच्या मृत्यूचेही भांडवल करून, प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी भ्रष्ट यंत्रणा आजदेखील तेवढ्याच ताकदीने कार्यरत असल्याचे सत्य हडपसर परिसरात उघडकीला आले आहे. दफनविधीसाठी खड्डा खोदण्यासाठी येथील पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची अडवणूक करून, अव्वाच्या सव्वा रक्कम लुबाडत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेचे कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांकडून उकळतात पैसे
हडपसरमधील अक्षरधाम स्मशानभूमीमध्ये मृत व्यक्तीला दफन करायचे असेल तर खड्डा घेणे आणि माती भरून देणे या कामासाठी पुणे महानगरपालिकेचे तेथील कर्मचारी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची अडवणूक करून, त्यांच्याकडून सुमारे ३ हजार रुपये घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Hadapsar News) मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय महानगरपालिका यंत्रणेला लागलेली आहे, ती थांबणार कधी? हाच मोठा प्रश्न आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ससाणेनगरमधील एक व्यक्ती मृत झाली. या वेळी माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी महानगरपालिकेचा जेसीबी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीमध्ये खड्डा घेण्यासाठी पाठवला. (Hadapsar News) संबंधित अंत्यसंस्कार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाले. या घटनेनंतर दोन दिवसांनी नातेवाईकांशी ससाणे यांनी संपर्क साधला असता, नातेवाईकांकडून तेथील कर्मचाऱ्यांनी ३ हजार रुपये घेतल्याची तक्रार करण्यात आली.
दरम्यान, या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी नगरसेवकांनी स्मशानभूमीत जाऊन चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर येथील ठेकेदार पोटे यांच्याशी संपर्क साधून ही गोष्ट कानावर घातली; परंतु त्यांच्याकडून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही. (Hadapsar News) अखेर योगेश ससाणे यांनी ही बाब महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि लेखी पत्र देणार असल्याचे सांगितले.
पुण्यासारख्या महानगरांमध्ये मृत्यू देखील फुकट मिळत नाही. लाकूड फाटा जाळण्यासाठीचे सामान विकत घेणे हे क्रमप्राप्तच आहे; परंतु महापालिकेच्या जेसीबीने घेतलेला खड्डा नातेवाईकच बुजवत असतात,(Hadapsar News) परंतु चार-दोन फावडी मारल्यानंतर सुद्धा येथील कर्मचारी तीन हजार रुपये उकळत असतील, तर प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे दुसरे काय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Hadapsar News : हडपसर येथील केरला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकारी कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार