Gudipadwa | पुणे : गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात नववर्ष दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. याच दिवसाला आपण गुढीपाडवा देखील म्हणतो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त…
१) गुढीपाडव्याची आख्यायिका (पुराण)
ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते. ही एक पुराणातील आख्यायिका आहे. तसेच रामायण काळामध्ये प्रभू श्री राम जेव्हा रावणाचा वध करून पुन्हा अयोध्याकडे आले होते. त्यावेळेस अयोध्यावासीयांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते.
२) शुभ मुहूर्त
यावर्षी गुढीपाडवा हा सण २२ मार्च २०२३ रोजी आहे. या दिवशी सकाळी ६.२९ ते ७.३९ या मुहूर्तावरती सर्वांनी गुढी उभारावी. ही गुढी आपल्या घराकडे तोंड करून उभरावी. या गुढीवरती तांब्याचा कलश, नवीन वस्त्र, कडूलिंबाचा पाला, साखरगाठ बांधलेली असावी. त्यावर हळदीकुंकू वाहवे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी पुरणपोळी अथवा गोडपदार्थ बनवावेत. आणि त्याचा नैवेद्य गुढीला आणि देवाला दाखवावा.
३) गुढीवरती कलश उलटा का ठेवतात?
गुढीवरती जो आपण कलश लावतो तो कलश हा ब्रम्हध्वजाचे प्रतीक म्हणून मानले जाते. ज्या कलशातून साखरगाठ नवीन वस्त्रे कडुलिंबाचा पाला अशा विविध गोष्टी आपल्या घरी समृद्धी यावी. यासाठी बांधल्या जातात. या सर्वांचे प्रतीक म्हणून हा कलश उलटा ठेवला जातो.
४) कडुलिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व
गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला आणि कडुलिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला कडूलिंबाचा पाला बांधतो. तसेच या दिवशी गुळ आणि कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसाद देखील खाल्ला जातो.
याबाबत बोलताना ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे म्हणाले कि, कडुलिंब हे आरोग्याला चांगले असते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा पाला खावा. तसेच उन्हाळा सुरू असल्यामुळे कडुलिंबाच्या पाल्याने शरीर शांत आणि शुद्ध होण्यास मदत होते. घराच्या दाराला कडुलिंबाचा पाला बांधल्यामुळे त्याच्याद्वारे येणाऱ्या वाऱ्यामुळे घरात देखील निरोगी वातावरण राहते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Festival News | गुढीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर ; बाजार पेठेत खरेदीची लगबग
Crime News | कुख्यात गुंड निलेश घायवळचे फ्लेक्स लावणे पडले महागात ; तिघांवर गुन्हा दाखल