उरुळी कांचन, (पुणे) : येथील महाराजा प्रतिष्ठान आयोजित श्री रामनवमी निमित्त भारतीय जनता पक्ष उरुळी कांचनचे शहराध्यक्ष अमित सतीश कांचन यांच्या संकल्पनेतून विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने भव्य चित्रकला स्पर्धेचे रविवारी (ता. 14) आयोजन करण्यात आले होते.
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये चित्रकला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत उरुळी कांचन, सोरतापवाडी, टिळेकरवाडी, कोरेगाव मूळसह परिसरातील गावातील 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत 6 ते 14 वयोगटातील लहान गट आणि 15 ते 21 मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते. महाराजा प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे पालकांकडून कौतुक केले जात आहे.
लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श गाव, छत्रपती शिवाजी महाराज, माझी शाळा, व निसर्ग चित्र, काढायचे होते. तर मोठ्या गटासाठी झाडे लावा झाडे जगवा, इतिहासातील एक प्रसंग, जगाचा पोशिंदा शेतकरी, कोरोना महामारी श्रीराम अयोध्या मंदिर, यापैकी एक चित्र काढायचे होते. या स्पर्धेत 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. मोठ्या गटात प्रथम विजेत्याला स्पोर्ट सायकल,द्वितीय स्मार्ट वाच, तृतीय स्कूल बॅग, लहान गटातही स्पोर्ट सायकल, द्वितीय स्मार्टवॉच, तृतीय स्कूल बॅग असे बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, उरुळी कांचन येथील महाराजा प्रतिष्ठानकडून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मागील तीन वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धा सुरू असताना सर्व विद्यार्थ्यांना शिस्तीत, कचरा करू न देता, सुंदर चित्रे काढण्यासाठी आयोजकांनी प्रोत्साहित केले होते.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कांचन, पूजा सणस, खुशाल कुंजीर, सचिन कुंभार, काजल खोमणे, रोहिणी नागवडे, आशुतोष तुपे, सचिन बारबोले, अजिंक्य कांचन, गणेश मेमाणे, नवनाथ चव्हाण, मयूर कुंजीर, यश भुजबळ, अजिंक्य कांचन, यश बारस्कर, अक्षय शेलार, सनी मोहिते, आदित्य पवार, अनिल कोळी, नेताजी पोपळे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.