Good News | पुणे – केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे १ एप्रिलपासून गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना लागणाऱ्या औषधाच्या किमती कमी होणार आहेत. मात्र याचा लाभ वैयक्तिक औषधे आयात करतात अशा लोकांनाच मिळणार आहे. यामुळे गंभीर आजाराने त्रस्त आहेत आणि त्यांना परदेशातून औषधे आयात करावी लागतात, अशा लोकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
देशाबाहेरून येणाऱ्या औषधांवरील आयात शुल्क रद्द…
केंद्र सरकारने देशाबाहेरून येणाऱ्या औषधांवरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय दुर्मिळ रोग धोरण २०२१ अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या सर्व दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी आयात करण्यात आलेल्या औषधांवर आणि विशेष अन्नावरील मूलभूत आयात शुल्क देखील सरकारने रद्द केले आहे.
तसेच कर्करोगावर उपचार करणाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या Pembrolizumab (Keytruda) वर देखील सरकारने सूट दिली आहे. मात्र यासाठी रुग्णाला केंद्र किंवा राज्य आरोग्य सेवा संचालक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. अशा औषधांसाठी १० टक्के इतके मुलभूत शुल्क आकारले जाते.
तसेच जीवनरक्षक औषधे आणि इंजेक्शनवर ५ टक्के कर आकारला जातो. स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी किंवा ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी काही औषधांना सूट देण्यात आलेली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Suicide News : पती-पत्नीच्या आत्महत्येने पुणे जिल्ह्यात खळबळ ; तीन महिन्यापुर्वीच झाला होता विवाह