Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : पुण्यात बैलगाडा शर्यतीला गालबोट ; घड्याळाची वेळ चुकली अन् तुफान दगडफेक…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 April 2023, 13:24

(Pune) पुणे : राज्यात बैलगाडा शर्यतीची मोठी क्रेझ आहे. शर्यतीवरील बंदी उठवल्या पासून गावागावात बैलगाडा शर्यतींचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जात आहे. नागरिकांच्या मोठी गर्दी या शर्यतींना असते. मात्र आता बैलगाडा शर्यतीला गालबोट लागल्याचे समोर आले आहे.

खेड तालुक्यामधील चऱ्होली येथे पाच दिवस महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शेवटच्या दिवशी या शर्यतीला गालबोट लागल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाडा पळवल्यानंतर बैलगाडा घाटात तुफान दगडफेक करण्यात आली. बैलगाडा धावण्याच्या वेळी घड्याळ चुकीचे दाखवल्याच्या कारणावरून आयोजकांवर ही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर घाटात तुफान राडा झाला.

पोलिसांनी काही जणांना घेतले ताब्यात…!

दगडफेक करणाऱ्यांना नागरिकांनी चोप दिला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ बैलगाडा घाटात दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. खेड तालुक्यातील चऱ्होली येथे खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर पाटील यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता.

 

या शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. अनेक दिग्गज नेत्यांनी या स्पर्धेला भेटी देखील दिल्या होत्या. मात्र शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाड्या वेळी हा अनुचित प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.

गेल्या पाच दिवसांपासून या महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी अंतिम फेरीमध्ये 31 गाडे पळविण्यात येणार होते. यामध्ये एक गाडा हा मावळ तालुक्यातील असून, त्यांनीच आयोजकांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेक झाल्यानंतर घाटामध्ये असलेल्या नागरिकांनी संबधित गाडा मालक आणि त्यांच्या समर्थकांना बेदम चोपले.

पोलिसांनी कारवाई केली असल तरी याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आळंदी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेप्रमाणे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. मात्र या घटनेने कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. आमदार सुनील शेळके यांनी देखील यावेळी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26
Next Post

Good News | गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना मिळणार दिलासा ; केंद्र सरकारने घेतला हा निर्णय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.