Good News : उरुळी कांचन : ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरळी कांचन (ता. हवेली) गावात परंपरेनुसार विसाव्यासाठी थांबणार आहे. असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे. यामुळे विठुरायाच्या भक्तांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मात्र पालखी सोहळा लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार की नाही याचा निर्णय अध्याप अधांतरीच आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी १० जून ते २८ जून यादरम्यानचा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला होता. (Good News) यामध्ये उरुळी कांचन चा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल असे जाहीर केले होते. उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी व विठ्ठल प्रेमी वैष्णवांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पालखी सोहळा महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यासाठी थांबणार
त्यानंतर ग्रामस्थांनी यासंदर्भात उरुळी कांचन येथे एक बैठक घेतली आहे. जर पालखी सोहळा परंपरेनुसार गावात आलां नाही तर सत्याग्रह, गावबंद आंदोलन, रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. (Good News) आज अखेर संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी पालखी सोहळा परंपरेनुसार ग्रामदैवताच्या मंदिरासमोर आरती घेणार असून, त्यानंतर पालखी सोहळा महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यासाठी २ तास थांबणार आहे. असे जाहीर केले आहे.
दरम्यान, एकीकडे ‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा परंपरेनुसार उरळी कांचनला विसाव्यासाठी थांबणार असल्याचे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने जाहीर केले आहे. (Good News) तर दुसरीकडे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार की नाही. याचा निर्णय अध्याप अधांतरीच ठेवला आहे.
लोणी काळभोर ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या संदर्भात रविवारी (ता. ०४) बैठक पार पडली. या बैठकीत पालखी सोहळा परंपरेनुसार विठ्ठल मंदिरात मुक्कामी न आल्यास वारकऱ्यांना कोणतेही सहकार्य न करता गाव बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. (Good News) तसेच ५० ते ६० वर्षाची परंपरा मोडीत काढून पालखी गावात न आणण्याचा निर्णय घेतल्याने‘जगदगुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज’’ पालखी सोहळ्याच्या प्रमुखांवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर म्हणाले कि, पालखी सोहळा लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येण्याची ५० ते ६० वर्षापासूनची परंपरा आहे. (Good News) ती परंपरा विश्वस्तांनी मोडुन काढू नये. पालखी मुक्कामासाठी सर्व संबंधितांना पत्रक देऊन पालखी मुक्काम लोणी गावातच झाला पाहिजे. अशी विनंती केली आहे. या संदर्भात विश्वस्त दोन दिवसात निर्णय देणार आहेत. त्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.