Gem of Industry : पुणे : पुणे येथील शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने उद्योजक रवींद्र गिरी यांना कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते “उद्योगरत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा आयोजित त्रिसूत्री महाअधिवेशनात हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी प. पू. सुंदरगिरी महाराज, प. पू. योगी शाम भारती महाराज उपस्थित होते. Gem of Industry
शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्था महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा आयोजित त्रिसूत्री महाअधिवेशन गुणगौरव सोहळा शालेय साहित्य वाटप व मार्गदर्शन शिबीर तसेच राज्य समाज भूषण पुरस्कार सोहळा व मोफत वधुवर परिचय मेळावा पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन फातिमानगर पुणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Gem of Industry)
यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती, उद्योजक शंकर गायकवाड, दीपक गाढवे, शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, अविनाश भारती महाराज, पंडित रतन गोसावी, वीर पिता मुन्ना भाऊ गिरीगोसावी, शिव संभादादा गोकुळ गोसावी, अनिल पुरी, सुखदेव गिरी, जयंत गिरी गोसावी, स्वप्नील भैय्या भारती, योगेशभाऊ बन, धर्मवीर भारती, मेघाताई गोसावी, अविनाश भाऊ भारती, नेहा भारती हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रवींद्र गिरी यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत आपल्या स्वकर्तुत्वातुन तब्बल आठ कंपनीचा डोंगर उभारीत एक नवी ओळख निर्माण करीत पुण्यनगरीत आपल्या जीवनात अनेक चढ उतार पाहिले. मात्र काहितरी करून दाखवू शकतो अशी मनाशी खूणगाठ बांधून आठ कंपनीची स्थापना करीत शेकडो तरुणांच्या हाताला काम देत ग्रामीण भागातील उद्योजकांना एक आदर्श निर्माण केला आहे. आईवडील व गुरुजनांचा आशीर्वादाने समाजात उद्योगपती असा ‘किताब मिळविला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, हा संपूर्ण कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष सुदाम गोसावी, संदीप भारती, सूर्यकांत गिरीगोसावी, पंकज भारती, प्रकाश भारती व शिववंशीय दशनाम गोसावी समाज महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी मार्गदर्शक व समन्वयक यांनी आयोजित केला होता.