युनूस तांबोळी
Gavran mango has become rare… ! : शिरूर : ऊन्हाळ्याची सुट्टी लागली की गावरान आंबट कैरी वर ताव मारायचा. आंबा आणि आमरस याची मैफील जुळलेली असायची. त्यातून गावरान आंब्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असे. मात्र गेल्या काही वर्षापासून बदलेले वातावरण, वादळी वारा, गारपिटीने गावरान आंब्याला तडाखा सोसावा लागत आहे. आंब्याच्या झाडाला पाहिजे त्या प्रमाणात मोहर आला तरी तो गळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून गावरान आंबे आलेच नाहित. परीणामी गावरान आंबा बाजारपेठेतून गायब झाल्याचे चित्र आहे. (Gavran mango has become rare… ! Changed atmosphere, result of hailstorm and unseasonal rain)
मधूर रसाळ आंबा या गुणामुळे फळांचा राजा आंबा लोकप्रिय आहे. कैरी पासूनच या आंब्याची चव चाखायला खवय्ये तयार असतात. गावरान आंबा झाडाला लागल्यापासून तो पाडाला लागेपर्यंत याची उत्सुकतेने वाट पहात बसावी लागते. (Gavran mango has become rare… !) कच्च्या आंब्यापासून वर्षभर टिकणारे लोणच्याचा सर्रासपणे वापर केला जातो. जवळपास प्रत्येक घरात आंबट कैरीला अधिक पंसती देऊन लोणचे तयार केले जाते. ग्रामीण भागात जेवणात या कैरीच्या लोणच्याची मजा घेतली जाते.
पुर्वी ग्रामीण भागात गावरान आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात विकायला यायचे. याची आढी लावून पिकण्यासाठी ठेवणारे दुकानदारांची गावागावात एक वेगळी आगळीक होती. (Gavran mango has become rare… !) त्यापासून रस तयार करण्याकडे अधिक कल होता. दशहारी आंबा यामध्ये अधिक पसंतीला उतरायचा. या रसासोबत भजी, कुरडई, पापड, कांदा चटणी याचा पाहुणचार देखील व्हायचा. गेल्या काहि वर्षापासून अवकाळी पाऊस, बदललेले वातावरण, पाऊस, गारपिट याचा परीणाम नैसर्गीक आपत्तीत झाला आहे. गावरान आंब्याला मोहोर आल्यावर फुलगळ सुरू झाली आहे. त्यामुळे गावरान आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे.
बदललेले वातावरण, गारपिट आणि अवेळी पावसाचा परिणाम
दरम्यान, या वर्षी देखील वातावरणात बदल झाला असून अवेळी येणाऱ्या पावसाने गावरान आंबा दुर्मिळ झाला आहे. बाजारपेठेत गावरान आंबा दिसेनासा झाला आहे. या गावरान आंब्याची जागा आता कलमी आंब्यानी घेतली आहे. हापूस, केरशी, बदाम, लालबाग, आदी आंबे बाजारपेठेत दिसू लागले आहेत. गावरान आंबे मिळत नसल्याने रसासाठी कलमी आंबेच वापरले जात आहे (Gavran mango has become rare… !).बदललेल्या वातावरणाने शेतावर गावरान आंब्याची झाडे काढून टाकली जात आहे. त्याठिकाणी वेगवेगळ्या कलमी आंबे आता शेताच्या बांधावर दिसू लागली आहेत.
गावरान आंब्याचे लोणचे दुर्मीळ
बदललेल्या वातावरणाचा परीणाम गावरान आंब्यावर झालेला पहावयास मिळत आहे. गारपिट, वादळी वारा, अवेळी पाऊस याचा परीणाम गावरान आंबा गळतीवर झाला आहे. लोणचे अनेक प्रकारचे बनविले जाते. (Gavran mango has become rare… !) त्यात गावरान आंबट कैरी पासून तयार केलेले लोणच्याला अधिक मागणी असते. ग्रामीण भागात हे लोणचे वर्षानुवर्षे टिकवले जाते. रोजच्या जेवनात याचा वापर देखील प्रभावी केला जातो. गावरान कैरी उपलब्ध होत नसल्याने सध्या तरी कैरीचे लोणचे दुर्मीळ होत चालले आहे.
ग्रामीण भागात गावरान आंबे हे शेताच्या बांधावर अधिक पहावयास मिळायचे. मात्र बदलत्या वातावरणाने फुलगळती होऊ लागल्याने गावरान कैरीची उपलब्धता कमी झाली आहे. (Gavran mango has become rare… !) मोहोर आल्यावर फळ लागेपर्यंत कैरीचा सडाच जणू झाडाखाली पडलेला असतो. त्यापासून शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाही. त्यातून फायदा होत नसल्याने ही झाडे देखील नाहशी होऊ लागली आहे. या वर्षी गावरान आंबे देखील दुर्मीळ झाले आहे.
ए. बी. जोरी
कृषी पर्यवेक्षक शिरूर