पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील रवींद्र पाटील यांचे उपचारादरम्यान पुण्यातील एका खासगी रुग्णालयात सोमवारी (ता. ०४) निधन झाले आहे .
चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात सूरत हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले होते. त्यांच्यावर धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी गौतमीने आपल्या वडिलांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात दाखल केलं होतं. रवींद्र पाटील यांची धुळ्यात प्रकृती जास्त बिघडली होती. हि माहिती समजल्यानंतर तिने आपल्या वडिलांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत गौतमीने व्हिडीओ जारी करत आपण माणुसकी म्हणून आपल्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतल्याचं सांगितले होते.
दरम्यान, रवींद्र पाटील यांना दारुचं व्यसन होतं. या व्यसनामुळेच गौतमीची आई तिला घेऊन पुण्याला गेली होती. गौतमी पुण्यात लहानाची मोठी झाली. या दरम्यान तिने डान्स क्लास लावला. तसेच ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं. गौतमीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून ती प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली होती. या दरम्यान गौतमीने एका चित्रपटातही काम केलं. असं असताना गौतमीचं आज पित्याचं छत्र हरपलं आहे.