Gautami Patil : पुणे – महाराष्ट्राच्या तरुणाईच्या मनावर सध्या गौतमी पाटील राज्य करत आहे. तिच्या नृत्याची भुरळ लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्तीलाच नव्हे तर महिलांना देखील पडली आहे. असे असतान जिथे गौतमी तिथे वाद असे आता समीकरणच जणू झाले आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीमुळे पोलिसांचा फौजफाटा ठेवावाच लागतो. तरी सुध्दा वाद हे सुरुच आहेत. असे असतानाच आता थेट गौतमीच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला आहे.
गौतमी पाटीलची तरुणाईमध्ये चांगलीच हवा आहे. पाटील हे नाव राज्याला तसे नवे नाही. आता याच आडनावावरुन वाद होऊन गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे.
राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच गौतमीच्या आडनावाविषयी नवी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात गौतमीचे कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा…
गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. गौतमीच्या पाटील या आडनावावरून पुण्यात एक बैठक घेण्यात आली. त्यामुळे आता गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते.
एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीच्या तोडीस तोड गौतमीची कमाई आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात अधिक डिमांड आहे. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Gautami Patil : पुण्यात सायलेंट झोनमध्ये गौतमी पाटीलने धरला ठेका
Gautami Patil | गौतमी पाटीलच्या विरोधात “या” कारणामुळे बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल