पुणे : आषाढी अमावस्या, त्यात रविवार.. मग काय पुणेकरांनी सकाळपासूनच आखाड साजरा करायला मटण, चिकणची दुकाने गाठली आहे. सकाळपासूनच मटण आणि चिकणच्या दुकानाबाहेर पुणेकरांनी रांगा लावल्या आहेत.
उद्यापासून श्रावण सुरु होत आहे. उद्यापासून मांसाहार वर्ज्य असल्याने आजच ताव मारण्याची योजना अनेकांनी केली आहे. श्रावण आणि त्यानंतर अनेक सणांची मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खवय्यांसाठी खास असणार आहे.
अनेकांनी आज जोरदार ‘गटारी’ साजरी करण्याचे नियोजन केलं आहे. त्याच निमित्ताने पुण्यात देखील चिकन, मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्याचमुळे आज पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. चिकन मटनच्या दरात काहीशी वाढ जरी झाली असली तरी सकाळी सहा वाजल्यापासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर पुण्यातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.