उरुळी कांचन, (पुणे) : भारतीय जनता पार्टीच्या (सोलापूर रोड) हवेली तालुका अध्यक्षपदी नायगाव (ता. हवेली) येथील माजी उपसरपंच गणेश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
लोणीकंद (ता. हवेली) येथील भाजपा कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते निवडीचे पत्र गणेश चौधरी यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविण काळभोर, तालुकाध्यक्ष श्याम गावडे, आबासाहेब सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सुदर्शन चौधरी, पूनम चौधरी, संदीप सातव, प्रदीप सातव, भाजपा नेते अजिंक्य कांचन, विकास जगताप, जयप्रकाश सातव, भाजपा प्रदेश पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश चौधरी म्हणाले, “पक्षाने विश्वास दाखवुन माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे .ती जबाबदारी मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडील’ केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांच्या घरोघरी पोहोचविणारअसून सर्वसामान्यासाठी न्याय देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.