Pune: पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये जुगार खेळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी टिंबर मार्केटमध्ये रस्त्यावर बसून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी धाड टाकून भर रस्त्यावर जुगार खेळणार्यांवर कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले आहे. गणेश प्रकाश नामदे, धनराज बाबुराव जाधव, अक्षय हिरामण लोंढे, मोहम्मद उबश मोहम्मद यासिन खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींकडून 3 हजार रुपये रोख रक्कम व पत्त्यांचा कॅट जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी छापा टाकून चौघांना पकडले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी प्रकरणाविषयी अधिक माहिती देत सांगितले कि, पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये आरोपी रस्त्यात बसून जुगार खेळत होते. दरम्यान, खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कुलदिप व्हटकर, पोलीस नदाफ, पोलीस आशिष चव्हाण हे रात्री पावणे पावणेदहा वाजता टिंबर मार्केटमध्ये छापा टाकत चौघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, परिसरात आणखी किती ठिकाणी जुगार अड्डे आहेत याचा तपास करत आहेत.