विजय लोखंडे
वाघोली: श्री क्षेत्र वाडेबोल्हाई (ता.हवेली) येथे पुणे जिल्हा नियोजन समिती व ग्रामपंचायत ग्राम निधीतून विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये बोल्हाई देवी पालखी मार्ग रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गावामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत असून वाडेबोल्हाईची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु असल्याची माहिती सरपंच वैशाली केसवड व उपसरपंच किर्ती पायगुडे यांनी दिली.
वाडेबोल्हाई येथील राजु भोरडे यांचे घर ते बाळासाहेब केसवड यांच्या घराकडे जाणारा पालखी मार्ग रस्ता करणे, बोल्हाई मंदिर पालखी मार्ग १ किमी रस्ता डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय ते बाळु लोखंडे घर कॉर्नर रस्ता काँक्रीटीकरण करणे, केसनंद शिवरस्ता करणे, रिकामेवस्ती शिवरस्ता करणे, राधा नामा शिंदे ते पायगुडेवस्ती रस्ता करणे, वाडेगाव येथील प्रदिप शिंदे घर ते बाळासाहेब केसवड पालखी मार्ग रस्ता करणे, वाडेगाव ते खुटाळी रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र ते पायगुडेवस्ती रस्ता करणे, इंगळेमळा ते पायगुडेवस्ती रस्ता करणे, अशा मोठ्या आर्थिक निधीच्या विकास कामांचा समावेश आहे.
तसेच वाडेबोल्हाई ग्रामपंचायत ग्रामनिधी अंतर्गत वॉर्ड क्र.३ मध्ये बोल्हाई पालखी मार्ग रस्ता काँक्रीटीकरण करणे, वॉर्ड क्र.२ मध्ये बारांगणी उर्वरीत रस्ता डांबरीकरण करणे, वॉर्ड क्र.१ मध्ये पंडीत भोर ते साष्टे रोड मुरुमीकरण करणे, वॉर्ड क्र.४ मध्ये वाडेबोल्हाई साष्टे शिवरस्ता मुरुमीकरण करणे, जि.प.शाळा शौचालय बांधकाम, स्मशानभुमी शौचालय बांधकाम, ओपन जिम (जि.प.निधी), रिकामेवस्ती शिवरस्ता उर्वरीत काम, नवनाथआळी बंदिस्त गटार लाईन करणे ही कामे करण्यात येणार आहेत.
वाडेबोल्हाई गावची सर्वांगीण विकास होण्याचे उद्दिष्ठ समोर ठेऊन उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन काम करीत आहोत. मोठा आर्थिक निधी विविध विकास कामांसाठी मंजूर झाल्याने वाडेबोल्हाईची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु आहे.
– वैशाली केसवड, सरपंच-ग्रामपंचायत वाडेबोल्हाईरस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज, आरोग्य यासारख्या समस्या सोडविण्याचे काम आम्ही ग्रामपंचायत व शासनाच्या माध्यमातून करीत आहोत. ग्रामस्थांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजना, सेवा, सुविधा देण्याचेही काम आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करत गाव विकसित करीत आहोत.
-किर्ती पायगुडे, उपसरपंच – ग्रामपंचायत वाडेबोल्हाई