Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे अर्बन सेलच्या वतीने प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारे आंदोलन!

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 14 September 2024, 19:01
Agitation against traffic issue in pune by urban cell

पुणे : पुणे अर्बन सेलच्या वतीने डेक्कन येथील गुडलक चौकात कलाकार कट्ट्यालगत शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी वाहनचालक यांची जनजागृती आणि या समस्येचे निराकरण न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

 

आजमितीस पुणे शहर हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. वाढती लोकसंख्या आणि खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे, काळाची गरज बनली असून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आज हे डोळ्यांत अंजन घालणारे आंदोलन करण्यात आले. यावेळी सिग्नलला थांबून खास पुणेरी पाट्या हातात घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

आजमितीस ६० ते ६५ लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या शहरातील एकूण आरटीओ नोंदणीकृत वाहनांची संख्या ४४ लाख असून शहरात दरवर्षी सरासरी २ लाख वाहनांची भर पडत आहे. या व्यतिरिक्त शहरामधे दररोज हजारो वाहने इतर शहरांमधून ये-जा करित असतात. पुणे शहरातील रजिस्टर्ड वाहनांची अंदाजे संख्या दुचाकी ३५ लाख, कार ७.५ लाख, रिक्षा ८८ हजार, कॅब्स ३७ हजार अशी आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी असणाऱ्या वाहतुक पोलिसांची संख्या अत्यंत नगण्य अर्थात ११०० आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुविधांचा अभाव व मर्यादित बस संख्येमुळे नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीत नाहीत. पुणे शहरातील अकार्यक्षम सिग्नल ट्रॅफिक यंत्रणा, सार्वजनिक पार्किंग स्टेशनची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात, वाढत्या वाहनानुसार व शहरीकरणाच्या विस्तारानुसार नवीन रस्त्यांची निर्मिती व अस्तित्वातल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास पुणे महानगरपालिकेची अकार्यक्षम यंत्रणा या काही महत्त्वाच्या गोष्टींमुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटनीस नितीन जाधव, पुणे अर्बन सेलचे शराध्यक्ष्य स्वप्नील दुधाने, पुणे अर्बन सेलचे सदस्य राहुल पोटे, नीता गलांडे, मदन वाणी, वसंतकुमार भाटिया, युसुफ शेख, प्रमोद शिंदे, सचिन यादव, महेश कनेरकर, अमित भगत, गणेश ठोंबरे, सुरज शिंदे, पृथ्वीराज बेलदरे,प्रियांका तांबे, मीनल धनवटे, मच्छिंद्र उत्तेकर, अद्वैत कोंढरे, अमित गोडांबे, पुष्कर भिलारे, ऋषिकेश मारणे तसेच अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Buffalo injured in handmade bomb blast in nere bhor pune

भिगवणमधील सकुंडे वस्तीजवळ तीन म्हशींना चार चाकीची जोरदार धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.